करदात्यांना सरकारने दिलं दिवाळी रिटर्न गिफ्ट; वाचा सविस्तर बातमी


नवी दिल्ली : आयकर विभागाने (Income Tax Department) ६३.२३ लाखांहून अधिक करदात्यांच्या खात्यात आयटीआर परताव्याचे (IT Refund) ९२,९६१ कोटी रुपये जारी केले आहेत. आयकर विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १ एप्रिल २०२१ ते १८ ऑक्टोबर २०२१ दरम्यानचा परतावा जारी केला आहे. आयकर विभागाने ६१,५३,२३१ वैयक्तिक प्रकरणात २३,०२६ कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. त्याचबरोबर १,६९,३५५ प्रकरणांमध्ये ६९,९३४ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा जारी करण्यात आला आहे. आयटी विभागाने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

परतावा न मिळण्याची कोणती कारणे असू शकतात?
आयकर विभागाचे म्हणणे आहे की, ज्यांना अद्याप मूल्यांकन वर्ष २०२०-२१ साठी परतावा मिळालेला नाही, अशा करदात्यांशी आमचा विभाग संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आहे. यासाठी करदात्यांचा प्रतिसाद आवश्यक असेल. विभागाच्या म्हणण्यानुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये, कलम २४५ अंतर्गत समायोजन आणि बँक खात्यांतील चुकांमुळे परतावा अयशस्वी होऊ शकतो.

आयकर विभागाने पाठवलेल्या परताव्याची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही विभागाच्या नवीन ई-फाइलिंग वेबसाइटला भेट देऊ शकता. येथे लॉग इन केल्यानंतर, आयकर परताव्याचा पर्याय दिसेल, जिथे आपण तपशील तपासू शकता. ज्यांना आतापर्यंत परतावा मिळाला नाही, त्यांच्यासाठी विभागाने एक सल्लाही दिला आहे.

नवीन आयकर पोर्टलवर असा तपासा
– सर्वप्रथम आयकर वेबसाइट www.incometax.gov.in वर जा आणि तुमचा पॅन यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून खात्यात लॉग इन करा.

– लॉग इन केल्यानंतर ई-फाइल पर्यायावर क्लिक करा. ई-फाइल पर्यायाखाली, प्राप्तिकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न्स) निवडा आणि त्यानंतर व्ह्यू फाइल्ड रिटर्न्स पर्यायावर क्लिक करा.

– यानंतर तुम्ही दाखल केलेले नवीन आयटीआर (ITR) तपासा. तपशील पहा पर्याय निवडा. एकदा निवडल्यानंतर तुम्हाला आयटीआर दाखल केल्याचे तपशील दिसेल. यामध्ये तुम्हाला कर परतावा जारी करण्याची तारीख, परत केलेली रक्कम आणि या वर्षाची थकबाकी असलेल्या कोणत्याही परताव्याच्या मंजुरीची तारीख दिसेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: