बांगलादेश: दुर्गा पूजा मंडपात कुराण ठेवणाऱ्याची ओळख पटली; सीसीटीव्हीमुळे खुलासा


ढाका: नवरात्रौत्सवात बांगलादेशमध्ये दुर्गा पूजा मंडपावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. कोमिल्ला पोलिसांनी हिंसाचारास जबाबदार असलेल्या व्यक्तीची ओळख पटवली आहे. या व्यक्तीनेच दुर्गा मंडपात कुराणची प्रत ठेवली होती. त्यानंतर कोमिल्ला आणि इतर ठिकाणी दंगल पेटली.

पोलिसांनी आरोपीचे नाव इक्बाल हुसैन असल्याचे सांगितले आहे. कोमिल्ला जिल्ह्यातील सुजानगरमध्ये राहणाऱ्या हुसैनने १३ ऑक्टोबर रोजी मंडपात कुराणची एक प्रत ठेवली होती. आरोपीबाबत लवकरच अधिक माहिती दिली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मंडपाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेज पाहिल्यानंतर इक्बाल हुसैन हा आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बांगलादेशमध्ये हिंदूवर हल्ले; पंतप्रधानांचे कारवाईचे आदेश, ४५० जण अटकेत

इक्बालने मशिदीतून कुराणची एक प्रत दुर्गा पूजा मंडपात नेली. त्यानंतर त्याने हनुमानाच्या मंदिराजवळ असलेल्या जमावासोबत चालण्यास सुरुवात केली.

बांगलादेशचे गृहमंत्री म्हणाले, ‘दुर्गा पूजा मंडपावर हल्ले हा सुनियोजित कट’
सध्या आरोपी फरार असून त्याला अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही. आरोपी इक्बालचा भाऊ, कुटुंबीयांकडून पोलिसांना सहकार्य केले जात आहे. त्याच्या मानसिक स्थितीचा कोणीतरी फायदा उचलून हे कृत्य केले असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

हिंसाचार प्रकरणी कोमिल्ला पोलिसांनी चार प्रकरणे दाखल करून घेतली असून ४१ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील चार जण हे आरोपी इक्बालचे सहकारी आहेत. इक्बाल हा अमली पदार्थाच्या आहारी गेला असल्याचे त्याच्या आईने ‘ढाका ट्रिब्युन’ला म्हटले. जवळपास १० वर्षांपूर्वी शेजाऱ्यांनी त्याच्या पोटात सुरा खुपसल्यानंतर त्याला मानसिक धक्का बसला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: