केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गरजूंना अन्नधान्य किटचे मोफत वितरण

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गरजूंना अन्नधान्य किटचे मोफत वितरण Free distribution of food kits to the needy by Union Minister of State Ramdas Athawale

मुंबई,दि.12 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते आज बांद्रा येथील संविधान निवासस्थानी गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी रिपाइं गुजराती आघाडीचे मुंबई अध्यक्ष जयंतीभाई गडा उपस्थित होते.

  मागील महिन्याभरापासून लॉकडाऊन सुरू असल्याने मोलमजुरी करणाऱ्या गरीब गरजूंचा रोजगार बुडाल्याने काही प्रमाणात गरीब गरजूंना पीठ,डाळ,मीठ,तेल आणि अन्नधान्याचे किट ना. रामदास आठवले यांच्या हस्ते मोफत वितरित करण्यात आले.गतवर्षीही ना.रामदास आठवले यांनी लॉकडाऊन च्या काळात गरीब गरजूंना 3 महिने दररोज अन्नदान आणि रेशन वाटप तसेच सॅनिटायझरसह अनेक उपयोगी वस्तूंचे वाटप केले होते.यावेळी रिपाइंचे प्रवीण मोरे,घनश्याम चिरणकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

ग्रामीण भागातील नागरिकांना या कोरोना काळात मदत व्हावी यासाठी ना. रामदास आठवले यांनी पक्षाच्या माध्यमातून मदत करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: