पुणे जिल्ह्यात बँकेत भरदुपारी दरोडा; तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा ऐवज लंपास


हायलाइट्स:

  • ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या बँकेवर दरोडा
  • अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लूट
  • भरदुपारी घडलेल्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे पिंपरखेड इथं ‘बँक ऑफ महाराष्ट्र‘ या बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील जवळपास २ कोटी रुपये किमतीचे सोने आणि ३० ते ३५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे.

दुपारच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील पाच ते सहा इसम अचानकपणे शस्त्रांसह बँकेत घुसले. बँकेतील अधिकाऱ्यांवर पिस्तुल रोखत या दरोडेखोरांनी काही क्षणांतच सर्व ऐवज लुटला. बँकेवर दरोडा टाकण्यासाठी आलेले दरोडेखोर हे सिल्व्हर रंगाच्या सियाज कारमधून पळून गेले. भरदुपारी घडलेल्या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

‘समीर वानखेडेंची नोकरी घालवणार, त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

दरोडेखोर कोणत्या दिशेने गेले?

बँक दरोड्यातील आरोपी नगरच्या दिशेला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे व इतर गावातील पोलीस पाटील यांनी सदरचा मेसेज आपापल्या गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करावा आणि अशी गाडी व संशयित व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: