टी-२० वर्ल्डकपसाठी कशी आहे खेळपट्टी; टीम इंडिया या मैदानावर खेळणार सर्वाधिक सामने


दुबई: टी-२० वर्ल्डकपमधील सुपर-१२ मधील सामने २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. पहिली मॅच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होतील. वर्ल्डकपचे आयोजन युएई आणि ओमान या दोन देशात होत असले तरी मुख्य स्पर्धेतील सर्व लढती युएईमधील तीन मैदान अबुधाबी, दुबई आणि शारजाह येते होणार आहेत. याच मैदानावर आयपीएलमधील सर्व सामने खेळवण्यात आले होते. जाणून घेऊयात या मैदानावरील खेळपट्टी बद्दल….

वाचा-ना विराट, ना रोहित; भारताच्या मोठ्या विजयामागे होता मेंटॉर धोनीचा मास्टर प्लॉन

शारजाह- आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात या मैदानावरील खेळपट्टी पूर्णपणे बदलण्यात आली. आयपीएल २०२० मध्ये या मैदानावर प्रत्येक टीमने १२ चेंडूत एक षटकार मारला होता. पण २०२१ मध्ये ही संख्या फक्त २३ इतकी होती. येथे आयपीएलमधील १० सामन्यात फक्त ९८ षटकार मारले गेले. ही खेळपट्टी पूर्णपणे संथ झाली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात ज्या गोलंदाजांनी वेगात बदल केला त्यांना अधिक यश मिळाले. जलद गोलंदाजांची सरासरी ६.९२ तर फिरकींची सरासरी ६.७९ इतकी होती. त्यांनी अनुक्रमे २२ आणि १७ गडी बाद केले. या मैदानावर न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांच्या लढती होणार आहे. भारताची लढत साखळी फेरीत येथे होणार नाही. खेळपट्टी आयपीएलसारखी असेल तर पाकिस्तान आणि आफ्रिकेसाठी फायद्याचे ठरले.

वाचा- Video: धोनीने सूत्रे हाती घेतली; सर्वात आधी घेतली या खेळाडूची शाळा

दुबई– या खेळपट्टीत गेल्या काही वर्षात बदल झालेला नाही. संथ असली तरी वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात येथील सरासरी धावसंख्या १५० ते १६० इतकी आहे. फिरकीपटूंनी या मैदानावर ३२ धावा देत १ विकेट तर जलद गोलंदाजांनी २७ धावा देत एक विकेट घेतली आहे. या मैदानावर जलद गोलंदाज अधिक यशस्वी होतात. त्यामुळे संघ ३ वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरतात. भारतीय संघ या मैदानावर साखळी फेरीतील पाच पैकी चार सामने खेळणार आहे. यामुळे संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी याचा समावेश नक्कीच असेल. तिसरा जलद गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार किंवा शार्दूल ठाकूरचा विचार केला जाईल.

वाचा- भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानचा पराभव; तर विद्यमान विजेत्यांना अफगाणिस्ताने दिला धक्का

अबुधाबी– या मैदानावर भारतीय संघ साखळी फेरीतील एकमेव मॅच खेळणार आहे आणि ती लढत अफगाणिस्तानविरुद्ध आहे. अबुधाबीचे मैदान फलंदाजांसाठी मदत करणारे आहे. पण येथे सीमारेषा दुबई आणि शारजाहपेक्षा लांब आहे. त्यामुळे गोलंदाजांना देखील संधी आहे. येथे फिरकीपटूंना अधिक वाव मिळत नाही. या मैदानावर फिरकीपटूंनी ३३ धावांमागे १ विकेट मिळवली आहे. तर जलद गोलंदाजांनी २९ धावात एक विकेट घेतली आहे. रात्रीच्या सामन्यात दवाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करणे अधिक चांगले ठरले. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांना येथे प्रत्येकी दोन तर अफगाणिस्तानला ३ सामने खेळायचे आहेत.

वाचा- एका व्यक्तीमुळे भारतीय ड्रेसिंग रुममधील वातावरण बदलले; या खेळाडूने केला मोठा खुलासा

टॉस जिंकल्यानंतर काय करावे

वर्ल्डकपचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केले जात आहे. या काळात युएईमध्ये थंड वातावरण असते. आयपीएल २०२० चे आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात झाले होते. तेव्हा पहिल्या सत्रात उष्ण वातावरण होते आणि दव कमी होते. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ७७ टक्के सामने जिंकले. तर दुसऱ्या सत्रात म्हणजे जेव्हा आता वर्ल्डकपचे आयोजन सुरू आहे तेव्हा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी ७७ टक्के विजय मिळवला.

भारताचे वेळापत्रक

> भारत विरुद्ध पाकिस्तान- २४ ऑक्टोबर, संध्याकाळी ६ वाजता, दुबई
> भारत विरुद्ध न्यूझीलंड, ३१ ऑक्टोबर ,संध्याकाळी ६ वाजता, दुबई
> भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ३ नोव्हेंबर, संध्याकाळी ६ वाजता, अबुधाबी
> भारत विरुद्ध बी १, ५ नोव्हेंबर,संध्याकाळी ६ वाजता, दुबई
> भारत विरुद्ध ए २, ८ नोव्हेंबर, संध्याकाळी ६ वाजता, दुबईSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: