‘शाहरूखच्या मुलाच्या अटकेला हिंदू-मुस्लीम रंग देण्याचा भाजपचा प्रयत्न’


हायलाइट्स:

  • राजकीय वातावरण पुन्हा तापलं
  • आर्यन खान प्रकरणावरून नाना पटोले यांचा भाजपवर गंभीर आरोप
  • महागाईच्या मुद्द्यावरूनही केलं लक्ष्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्र्ग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरणही तापलं आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या अटकेवरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

‘कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, जे चुकीचं करतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो अंमली पदार्थ सापडले, त्याचं पुढे काय झालं? त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमली पदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचं दाखवलं जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ असं वाटतं. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली त्याला हिंदू-मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हीन प्रयत्न भाजपाकडून होत आहे,’ असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

Pravin Mankar Bribery Case: पालिका अधिकाऱ्याकडे कोट्यवधीचे घबाड; ३ फ्लॅट, ११ लाख कॅश, अर्धा किलो सोनं!

महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस राज्यभर जेलभरो आंदोलन करणार

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली असून मंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणं कठीण झालं आहे. काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली, पण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियानाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केलं जाणार असून यावेळी ‘जेलभरो’ आंदोलनही केलं जाणार आहे,’ अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

NCP vs Congress: महाविकास आघाडीत फोडाफोडी!; बीडमधील काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादीत

टिळक भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, या बैठकीत संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. देशात व राज्यात भाजपने चालवलेल्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड संताप व चीड आहे. भाजप जाती धर्मांत फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजत आहे. काँग्रेस सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा जनाधार मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये चौथ्या क्रमांकावरून पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर आला आहे. या कामगिरीत सातत्य ठेवून पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देणे व सोनियाजी व राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असं आवाहन पटोले यांनी केलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: