मेगा IPO आधी पेटीएमला बसला असा झटकानवी दिल्ली : देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. चिनी अब्जाधीश जॅक मा यांच्या अँट ग्रुप कंपनीने यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही कंपनी दिवाळीच्या आसपास लाँच करण्याची तयारी करत आहे. हा आजवरचा देशातील सर्वात मोठा आयपीओ असल्याचे मानले जाते. पेटीएमचा आयपीओ १६,६०० कोटी रुपयांचा असेल, पण मूल्यांकनाबाबत असलेल्या मतभेदांमुळे कंपनी २००० कोटी रुपयांची आयपीओ पूर्व (प्री-आयपीओ) विक्री करण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

सूत्रांच्या मते, पहिल्या गुंतवणूकदारांच्या (इनिशियल इनव्हेस्टर फिडबॅक) अभिप्रायावर आधारित कंपनी २० अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन शोधत आहे, पण सल्लागारांनी या करारासाठी कमी मूल्यांकनाची शिफारस केली आहे. युनिकॉर्न ट्रॅकर फर्म सीबी इनसाइट्सच्या मते पेटीएमचे शेवटचे मूल्यांकन १६ अब्ज डॉलर होते. अनेक कंपन्यांच्या आयपीओंना यावर्षी मोठी पसंती मिळाली आहे आणि हे पाहता पेटीएमही मजबूत गुंतवणूकदारांची अपेक्षा करत आहे.

२० अब्ज रुपये उभारण्याची योजना
दरम्यान, कंपनीने आयपीओ पूर्व विक्री (प्री-आयपीओ सेल) समाप्त करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कंपनी कमी मूल्यांकनावर देखील याचा विचार करू शकते. मॉर्गन स्टॅन्ली, गोल्डमन सॅक्स ग्रुप आयएनसी, सिटीग्रुप आयएनसीआणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लि. या शेअर विक्रीशी जोडलेले आहेत. सेबीकडे सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार कंपनी प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे २० अब्ज कोटी रुपये उभारण्याचा विचार करू शकते.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: