Fuel Prices: ‘मोदींच्या खरबपती मित्रांच्या’ माध्यमातून प्रियांका गांधींचा सरकारवर निशाणा


हायलाइट्स:

  • पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींवर प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया
  • ‘मोदींचे खरबपती मित्र मात्र दररोज कोट्यवधी रुपये कमावत आहेत’
  • आज मुंबईत पेट्रोल ११२.७८ रुपये तर डिझेल १०३.६३ रुपये प्रती लीटर

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींसह महागाईनं सामान्यांना हैराण करून टाकलंय. या मुद्यावर विरोधकांकडून जवळपास प्रत्येक दिवशी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा इंधनांच्या वाढीव किंमतींवरून नरेंद्र मोदी सरकारला निशाण्यावर घेतलंय. (Priyanaka Gandhi On Fuel Prices)

सामान्यांवर कराचं ओझं लादून सरकार लाखो रुपये कमावत आहे. सामान्य व्यक्तीचं उत्पन्न मात्र घटत चाललंय, असं म्हणतानाच ‘मोदींचे खरबपती मित्र मात्र दररोज कोट्यवधी रुपये कमावत आहेत’, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलीय.

​petrol diesel price hike : ‘सध्या मूठभर लोक पेट्रोल-डिझेल वापरतात’, भाजप मंत्र्याचं वक्तव्य
Flex Fuel Engines: ‘फ्लेक्स फ्युएल इंजिन’च्या वापरानं शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो? जाणून घ्या…
‘दररोज महागडं पेट्रोल डिझेल खरेदी कराल तेव्हा लक्षात ठेवा, मोदी सरकारनं पेट्रोलियम पदार्थांवर कर लावून २३ लाख कोटी रुपये कमावले आहेत. दररोज महागडं तेल – भाज्या खरेदी कराल तेव्हा हे लक्षात ठेवा की या मोदी सरकारच्या राज्यात ९७ टक्के कुटुंबांचं उत्पन्न घटलंय. परंतु, बातम्यांनुसार, मोदींचे खरबपती मित्र मात्र दररोज कोट्यवधी रुपये कमावत आहेत’, असं प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर म्हटलंय.

यापूर्वी, ‘त्यांनी हवाई चप्पल परिधान करणाऱ्यांना हवाई प्रवास घडवण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, आता त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एवढी वाढ केलीय की मध्यम वर्गासाठी रस्ते मार्गानं प्रवासही कठीण होऊन बसलाय’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारच्या जुन्या आश्वासनांची आठवण नागरिकांना करून दिली होती.

शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत वाढ दिसन आली. तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमतींत ३५ पैसे प्रती लीटरची वाढ केलीय.

मुंबईत आज पेट्रोलसाठी ११२.७८ रुपये प्रती लीटर तर डिझेल १०३.६३ रुपये प्रती लीटर उपलब्ध होतंय. तसंच दिल्लीत आज पेट्रोलच्या किंमती वाढून १०६.८९ रुपये प्रती लीटरवर पोहचल्या आहेत तर डिझेलसाठी नागरिकांना ९५.६२ रुपये प्रती लीटर मोजावे लागत आहेत.

लसीकरणावर व्हीआयपी संस्कृती लागू होऊ दिली नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi: आज पंतप्रधान मोदींच्या संबोधनात काय? ‘सोशल मीडिया’वर रंगली चर्चाSource link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: