lakhimpur kheri farmer : लखीमपूरच्या शेतकऱ्याने भर बाजारात पेट्रोल टाकून धानाला लावली आग
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ( lakhimpur kheri farmer ) धान विक्रीसाठी अनेक अडचणींना सामना करावा लागतोय. लखीमपूर खिरी जिल्ह्यातील मोहम्मदी परिसरातील मंडईमध्ये शेतकरी समोध सिंह यांनी त्यांच्या धानावर (भात पिक) पेट्रोल शिंपडून आग लावली. समोध सिंह हे गेल्या १४ दिवसांपासून आपल्या धानासह बाजारात भटकत होते. पण धान खरेदी करण्यास कोणीही तयार नव्हतं. यामुळे निराश झालेल्या समोध सिंह यांनी शुक्रवारी आपल्या धानाच्या ढिगावर पेट्रोल ओतून आग लावली. अत्यंत निराश झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.
lakhimpur kheri violence : सुप्रीम कोर्टाने यूपी सरकारची काढली खरडपट्टी, ‘स्टेटस रिपोर्टची रात्री उशिरापर्यंत वाट
car accident : दोन ट्रकमध्ये दबली गेली SUV, ८ जणांचा जागीच मृत्यू