मुस्लिम बांधवांनी जे जबाबदारीचे पालन केले आहे तसेच शिस्तिचे पालन ईदला करावे – तमिम सय्यद इनामदार Eid should be observed in accordance with responsibilities of the Muslim Brotherhood – Tamim Syed Inamdar
पंढरपूर - सध्या संपुर्ण देश हा कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेला लढा देत आहे. संपुर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग हा अधिक घातक आहे.अनेक लोकांचा मृत्यु या कोरोना संसर्गाने होत आहे.
यामुळेच सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणुन रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे,असे आवाहन भाजप अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीस तमिम सय्यद इनामदार,सोलापूर यांनी केले आहे.चंद्र दर्शनानुसार पंढरपुरासह सर्वत्र 14 तारखेला ईद साजरी करण्यात येण्याची शक्यता आहे. रोज्यांमध्ये सुर्योदयापुर्वि खाणे (सहेरी) अपेक्षित आहे,तर सुर्योदयानंतर जेवन(इफ्तार) करण्याची परवानगी आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात केलेले सर्व रोजे ईदच्या दिवशी सोडले जातात. दर वर्षी सगे सोयरे, मित्र परिवार, शेजार्यांसमवेत मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी ईद यावर्षी साधेपणाने साजरी करावी.
शासनाने दिलेले नियमांचे व सुचनांचे पालन करत तसेच आपल्या तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून जेणेकरून या कोरोना संसर्गाचा फैलाव होणार नाही याची काळजी सर्व मुस्लिम बांधवांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक भान राखत साधेपणाने ईद साजरी करत सर्वांच्या दिर्घायुष्या साठी दुआ प्रार्थना करावी,असे आवाहन तमिम सय्यद इनामदार यांनी केले आहे.
रमजान महिन्याच्या काळात मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण न करता घरीच नमाज पठण करुन देशातील मुस्लिम बांधवांनी जे जबाबदारीचे पालन केले आहे तसेच शिस्तिचे पालन ईदच्या दिवशी करावे,असे आवाहन तमिम सय्यद इनामदार यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.तसेच तमाम हिंदु मुस्लिम बांधवांना रमजान ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Like this:
Like Loading...