sonia gandhi : भाजपला घेरणार! सोनिया गांधींच्या निवासस्थानी उद्या होणार काँग्रेसची सीईसीची बैठक


नवी दिल्लीः उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. यूपीत अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या संदर्भात काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक उद्या संध्याकाळी ६ वाजता पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होणार आहे.

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा पक्षाच्या विजयासाठी सतत विचारमंथन करत आहेत. गेल्या एका वर्षात यूपीतील प्रत्येक मोठ्या घटनेवर त्यांनी रस्त्यावर उतरून सत्ताधारी भाजपच्या योगी सरकारला घेरण्याची एकही संधी सोडलेली नाही. पण पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसला मोठा धक्का देत आहेत. एकीकडे कोणताही मोठा चेहरा काँग्रेसमध्ये दाखल होत नाही. दुसरीकडे अनेक ताकदवर नेते काँग्रेस सोडून जात आहेत.

जितीन प्रसाद आणि ललितेशपती त्रिपाठी हे बडे नेते काँग्रेस सोडून गेले आहेत. हे नेते अनेक पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये होते आणि ताकदवर मानले जात होते. एकीकडे कोणताही नवा मोठा चेहरा काँग्रेसमध्ये दाखत होत नाहीए. दुसरीकडे, जुन्या नेत्यांना एकत्र कसे ठेवायचे आणि नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी कसे जोडायचे, हे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान आहे.

Fuel Prices: ‘मोदींच्या खरबपती मित्रांच्या’ माध्यमातून प्रियांका गांधींचा सरकारवर निशाणा

उत्तर प्रदेशात काँग्रेस ४० टक्के उमेदवारी महिलांना देणार

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत ४० टक्के उमेदवारी देण्याची घोषणा मंगळवारी केली होती. राज्यातील विधानसभा निवडणूक पुढील वर्षाच्या सुरवातीला होणार आहेत. राजकारणात महिलांनी सत्तेत पूर्ण सहभाग घ्यावा. समाजात बदल हवा असेल तर महिलांना राजकारणात यावं आणि खांद्याला खांदा लावून पुढे जावं, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

लसीकरणावर व्हीआयपी संस्कृती लागू होऊ दिली नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: