स्पुटनिक-व्ही लसीची दुसरी खेप मिळणार लवकरच
स्पुटनिक-व्ही लसीची दुसरी खेप मिळणार लवकरच A second batch of Sputnik-V vaccine will be available soon
नवी दिल्ली,13/05/2021,(हिंदुस्थान समाचार) – रशियात बनलेल्या “स्पुटनिक-व्ही” या कोरोना प्रतिबंधात्मक लसीची दुसरी खेप लवकरच भारतात येणार आहे. मॉस्को येथील भारतीय राजदूत बाला वेंकटेश वर्मा यांच्या मते, उद्या शुक्रवारी रशियाने विकसित केलेल्या या लसीचे दीड ते दोन लाख डोस भारताला मिळतील. रेडडी लॅबला ही लस आयात करण्या संदर्भात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे.
भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात स्पुटनिक-व्ही लस कोरोना संसर्ग रोखण्यास उपयुक्त ठरेल. भारत सरकारकडून वापरण्यास देण्यात आलेली ही तिसरी लस आहे. तत्पूर्वी, सरकारने कोविशिल्ड आणि कोवाक्सिन वापरण्यास परवानगी दिली. महत्त्वाचे म्हणजे स्पुटनिक-व्ही लसची पहिली खेप या महिन्याच्या सुरूवातीस रशियाकडून पाठविली गेली होती.
रशियन सोव्हरान वेल्थ फंडच्या प्रमुखांनी अशी आशा व्यक्त केली होती की ही, लस भारतात सुरू असलेल्या लसीकरणाला बळकट करेल. भारता तील वाढत्या संसर्गाची गती रोखण्यासाठी हे प्रभावी ठरेल.