Pune Accident: पुण्यातील नऱ्हे सेल्फी पॉइंटजवळ पुन्हा भीषण अपघात; २ ठार, १२ जखमी


हायलाइट्स:

  • पुण्यातील नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ भीषण अपघात.
  • अपघातानंतर टँकर आणि टेम्पो ट्रॅव्हलरही झाला पलटी.
  • अपघातात २ जणांचा मृत्यू तर १० ते १२ जण जखमी.

धायरी/पुणे: पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ एथिल एसीटेटची वाहतूक करणाऱ्या टँकरने टेम्पो ट्रॅव्हलरला कट मारण्याच्या नादात जोरदार धडक दिली. यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर आणि टँकर पलटी होऊन झालेल्या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या अपघातात टँकरने एका दुचाकी चालकासह चार वाहनांना धडक दिली. ( Pune Accident Latest Update )

वाचा:‘समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलाल तर…’; नवाब मलिक यांना धमकीचा फोन

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, टँकर बेंगळुरूकडून मुंबईकडे निघाला होता. नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ आल्यानंतर या टँकरने बाजूने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला कट मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये टँकरची धडक बसल्याने, टेम्पो ट्रॅव्हलर उलटून शेजारच्या सर्व्हिस रोडलगत पडला. त्यानंतर टँकरने दुचाकी आणि कंटेनर या दोन वाहनांनाही धडक दिली. यामध्ये चार वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. एथिल एसीटेटची वाहतूक करणारा टँकर असल्याने खबरदारी घेऊन जमलेल्या लोकांना बाजूला करण्यात आले. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, वाहतूक सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

वाचा: मुंबई: वन अविघ्न पार्क बिल्डरवर गुन्हा दाखल; आग दुर्घटनेवर पालिका कठोर

या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला असून, हा परिसर अपघातांचा हॉटस्पॉट झाला आहे. पुलाच्या तीव्र उतारावरून येणारी भरधाव अवजड वाहने नियंत्रित न झाल्याने अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

टँकरने कट मारण्याच्या नादात ट्रॅव्हलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. या परिसरात वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत – देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस ठाणे

वाचा:आर्यन खान प्रकरण गाजत असतानाच गृहमंत्र्यांचं ड्रग्जबाबत परखड मत; म्हणाले…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: