जम्मू काश्मीर : शहिदाच्या पत्नीला अमित शहांकडून थेट नियुक्तीपत्र!


हायलाइट्स:

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवगावमध्ये पोहचले
  • शहिदाच्या पत्नीची घेतली भेट
  • जम्मू काश्मीर प्रशासनातील नोकरीचं नियुक्तीपत्र सोपवलं

जम्मू : जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारपासून तीन दिवसांच्या या दौऱ्यात पहिल्याच दिवशी गृहमंत्री श्रीनगरला दाखल झाले. त्यानंतर ते थेट नवगावला पोहचले. इथे त्यांनी शहीद पोलीस निरीक्षक परवेज अहमद धर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी शहिदाची पत्नी फातिमा धर यांना जम्मू काश्मीर प्रशासनात सरकारी नोकरी देण्याचं केवळ आश्वासन दिलं नाही तर थेट नियुक्ती पत्र सोपवलंय.

आपल्या या दौऱ्यात जम्मू काश्मीरच्या नागरिकांत विश्वास निर्माण करण्याचा गृहमंत्री अमित शहा यांचा मानस आहे. या दरम्यान ते खोऱ्यातील सुरक्षास्थितीचा आढावाही घेणार आहेत.

दिल्लीतून श्रीनगर विमानतळावर दाखल झालेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी उप राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. तसंच यावेळी जम्मू काश्मीर प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

amit shah visit to jammu and kashmir : अमित शहा आजपासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, कलम ३७० हटवल्यानंतर पहिलाच दौरा
Amarinder Singh: पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडची चर्चा

गृहमंत्री अमित शहा एका उच्च स्तरीय सुरक्षा समितीची बैठकही घेणार आहेत.

विरोधकांचा विरोध डावलत ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आला होता. तसंच जम्मू काश्मीर राज्य दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशात विभाजित करण्यात आलं होतं. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये आहेत.

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा व्यवस्था आणखीनच मजबूत करण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनसार, खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलंय.

दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना निशाण्यावर घेतलं जात असताना अतिरिक्त अर्धसैनिक दलाच्या ५० कंपन्यांना खोऱ्यात तैनात करण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आलीय. यासाठी श्रीनगरच्या अनेक भागांसहीत काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ्या भागांत केंद्रीय अर्धसैनिक दलानं बंकर उभारले गेले आहेत.

Parliament Session: मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडे पुढच्या महिन्यात आयती संधी?
Supreme Court: ‘आठ लाख उत्पन्नाचा आकडा कुठून? निकष सांगा, अन्यथा आरक्षण रोखू’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: