Forex Reserves: देशाच्या परकीय चलनसाठ्यात वाढ; आकडा ६४१ अब्ज डॉलरवर


नवी दिल्ली : १५ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा १.४९२ अब्ज डॉलरने वाढून ६४१.००८ अब्ज झाला आहे. आरबीआयने शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली. ८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या याआधीच्या आठवड्यात, २.०३९ अब्ज डॉलरच्या साठ्यात वाढ झाली होती. ३ सप्टेंबर २०२१ ला संपलेल्या आठवड्यात ६४२.४५३ अब्ज डॉलर्सचा उच्चांक गाठला होता.

परकीय चलन साठा वाढण्याचे कारण


१५ ऑक्टोबरला संपलेल्या सप्ताहात परकीय चलन मालमत्ता (एफसीए) मध्ये झालेली वाढ हे परकीय चलन साठ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, एफसीए ९५० दशलक्ष डॉलरने वाढून ५७७.९५१ अब्ज डॉलरवर पोहोचले आहेत.

Home Loan: ‘ही’ सरकारी बँक गृहकर्जावर देतेय बंपर ऑफर; जाणून घ्या सविस्तर
Fuel Price: कच्च्या तेलाच्या किमती या आठवड्यात पहिल्यांदाच घसरल्या; पेट्रोल-डिझेलवर परिणाम होणार?
सोन्याच्या साठ्यात वाढ

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात सोन्याचा साठा ५५७ दशलक्ष डॉलरने वाढून ३८.५७९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह विशेष रेखांकन अधिकार (स्पेशल ड्राइंग राईट्स – SDR) २१ दशलक्ष डॉलर घटून १९.२४७ अब्ज डॉलर झाले. आयएमएफमधील देशाची राखीव स्थिती ६ दशलक्ष डॉलरने वाढून ५.२३१ अब्ज झाली आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक सभेला संबोधित करताना सांगितले की, भारत खूप मजबूत आर्थिक पुनर्प्राप्ती करत आहे, पण अजूनही विविध क्षेत्रांमध्ये असमानता आहे. त्यांच्या भाषणाचा काही भाग आयएमएफने प्रसिद्ध केला. या व्हिडिओ क्लिपमध्ये दास म्हणाले की, आम्ही आमच्या चलनविषयक धोरणात उदारमतवादी राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचवेळी महागाईच्या दृष्टिकोनावरही बारकाईने लक्ष ठेवले आहे.

Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करताय; जोखीम आणि फायद्यांबद्दल जाणून घ्या
SGB 2021: गुंतवणूकदारांना सुवर्णरोखे खरेदीची ‘सुरक्षित’ संधीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: