रवींद्र मुळे यांच्या कार्य अहवालाचे आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रकाशन Publication of Ravindra Mules work report by MLA Tanaji Sawant
पंढरपूर - पंढरपूर शहर शिवसेनेचे शहर प्रमुख रवींद्र मुळे यांनी गेली दोन वर्षे शहर प्रमुख पदावर काम करत केलेल्या कामाची माहिती असलेल्या अहवालाचे प्रकाशन शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.त्याचा आवाजाचे पुस्तक असे नाव असलेले अहवालात 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे काम केले त्याची माहिती दिली आहे.
शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते शिवसेनेचे शहर प्रमुख रवी मुळे यांनी दोन वर्षे काम केलेले अहवालाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे समन्वय प्रमुख शिवाजी सावंत ,जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे,जिल्हा प्रमुख गणेश वानकर,भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत,मा.जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, तुकाराम भोजने,दत्ता पवार,जयवंत माने,युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे,तालुका प्रमुख महावीर देशमुख,सुर्यकांत घाडगे,नामदेव वाघमारे, सुधाकर लावंड,संजय कोकाटे,रश्मी बागल,गणेश इंगळे,कमरुद्दीन खतीब,समाधान दास,युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव,महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख आशा टोणपे,महिला आघाडी तालुका प्रमुख आरती बसवंती,संजय घोडके, संदीप केंदळे,ग्राहक कक्षाचे उपजिल्हा प्रमुख सिध्दनाथ कोरे,महेश साठे, उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,विनायक वनारे,पोपट सावंतराव,तानाजी मोरे,बाबा अभंगराव,समाधान अधटराव,अविनाश वाळके,सचिन बंदपट्टे, उपतालुका प्रमुख प्रविण शिंदे ,अर्जुन भोसले, विभाग प्रमुख महेश इंगोले,काका बुराडे,माऊली अष्टेकर आदींसह शिवसेनेचे पंढरपूर शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.