Loan Against PPF: कर्ज घेताय… वैयक्तिक आणि पीपीएफ लोनमध्ये काय आहे स्वस्त?


नवी दिल्ली : दीर्घ मुदतीची मालमत्ता खरेदी करायची नसल्यास कर्ज घेणे टाळावे, पण कधी कधी आयुष्यात अशी आणीबाणी येते की, कर्ज काढावेच लागते. सर्व प्रकारचे आर्थिक नियोजन असूनही, आपल्या सर्वांना कधी ना कधी कर्जाची गरज पडते. अचानक खर्चासाठी लोक वैयक्तिक कर्जाकडे वळतात, पण तज्ज्ञ म्हणतात की, जर तुम्हाला कमी कालावधीसाठी मोठी रक्कम कर्ज म्हणून घ्यायची असेल, तर तुमच्या पीपीएफ खात्यावरही कर्ज घेता येईल.वैयक्तिक की पीपीएफ कर्ज?

लोक साधारणपणे कोणत्याही आपत्कालीन खर्चासाठी वैयक्तिक कर्ज घेतात, पण काही पर्सनल फायनान्स तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, पर्सनल लोन व्यतिरिक्त पीपीएफ अकाऊंटवरही कर्ज घेतले जाऊ शकते. इनक्रेड फायनान्सचे रिस्क अँड अॅनालिटिक्सचे प्रमुख पृथ्वी चंद्रशेखर म्हणतात की, पीपीएफ कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यातील निवड करताना काही गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

वैयक्तिक आणि पीपीएफ कर्ज कोण घेऊ शकते?

चांगला क्रेडिट स्कोअर, ग्राहकाचे वय आणि नियमित उत्पन्न या गोष्टी वैयक्तिक कर्ज देताना पाहिल्या जातात. दुसरीकडे, तुम्ही पीपीएफ खाते उघडल्याच्या तिसऱ्या ते सहाव्या वर्षादरम्यान पीपीएफ कर्ज घेऊ शकता. याचा अर्थ असा की, जर तुम्ही आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल, तर तुम्ही २०१७-२०१८ या आर्थिक वर्षापासून कर्ज घेऊ शकता, पण तुम्ही हे कर्ज फक्त आर्थिक वर्ष २०२०-२१ पर्यंत घेऊ शकता.

महागाईबाबत आरबीआय गंभीर; गव्हर्नर म्हणतात, ‘४ टक्क्यांचं उद्दिष्ट गाठावंच लागेल’
महागाईचा परिणाम; तब्बल १४ वर्षांत पहिल्यांदाच काडीपेटीच्या किंमतीत वाढ
मी किती कर्ज घेऊ शकतो?

वैयक्तिक कर्जामध्ये कर्जाच्या कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. हे बँकेने दिलेल्या कर्जाच्या प्रमाणावर अवलंबून असते. वैयक्तिक कर्जाचे व्याजदरही खूप जास्त आहेत. साधारणपणे, त्यावर दरवर्षी १० ते २० टक्के व्याज आकारले जाते. तर पीपीएफमधून कर्ज घेतल्यावर कर्जाच्या रकमेवर फक्त एक टक्के व्याज आकारले जाते, परंतु हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, कर्जाच्या परतफेडीच्या कालावधीपर्यंत तुमच्या पीपीएफ योगदानावर कोणतेही व्याज दिले जात नाही. तर अशा प्रकारे तुमचा व्याज दर पीपीएफवरील व्याज दरामध्ये एक टक्का जोडल्यावर मिळालेल्या व्याजाच्या बरोबरीचा आहे. पीपीएफ योगदानावर ७.१० टक्के व्याज मिळत असेल, तर कर्जावर ८.१० टक्के व्याज लागू होईल. जेव्हा तुम्हाला थोड्या काळासाठी मोठ्या रकमेची गरज असते, तेव्हा पीपीएफसाठी कर्ज घ्यावे.

कर्ज परतफेड कालावधी

वैयक्तिक कर्ज जास्तीत जास्त सहा वर्षांसाठी असते. तर पीपीएफ कर्जाची परतफेड तीन वर्षांत करावी लागते.

व्याज दर

वैयक्तिक कर्जे असुरक्षित असल्याने त्याचा व्याजदर जास्त म्हणजे १० ते २० टक्के असतो, तर पीपीएफवरील व्याजदर त्यावर मिळणाऱ्या योगदानापेक्षा एक टक्का जास्त असते.

Forex Reserves: देशाच्या परकीय चलनसाठ्यात वाढ; आकडा ६४१ अब्ज डॉलरवर
Home Loan: ‘ही’ सरकारी बँक गृहकर्जावर देतेय बंपर ऑफर; जाणून घ्या सविस्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: