श्रीलंकेच्या तिजोरीत खडखडाट; भारताकडे मागितले ५० कोटी डॉलरचे कर्ज, हे आहे कारण


हायलाइट्स:

  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.
  • सध्या ते ८५ डॉलरच्या जवळ आहे. यामुळे श्रीलंकेला तेल आयात करण्यात अडचण येत आहे.
  • श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आर्थिक आणीबाणी जाहीर केली होती.

नवी दिल्ली : परकीय चलन संकटाच्या काळात तेल खरेदीसाठी भारताकडून ५० कोटी डॉलर कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रीलंका सरकारने शनिवारी (२३ ऑक्टोबर) सांगितले. याबाबत ऊर्जामंत्री उदय गम्मनपिला म्हणाले की, “कर्जाचा प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवला आहे. त्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर सादर केले जाईल.”

इंधन भडका ; आज पुन्हा महागले पेट्रोल आणि डिझेल, जाणून घ्या आजचा भाव
मंत्रिमंडळाने इंधन खरेदीसाठी ओमानकडून ३.६ अब्ज डॉलर कर्ज मंजूर केले आहे. परकीय चलनाचे संकट आणि जागतिक कच्च्या तेलाच्या उच्च किंमतींच्या पार्श्वभूमीवर जानेवारीपर्यंतच पुरेल इतका इंधन साठा देशात उपलब्ध असल्याचेही गम्मनपिला यांनी यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते. देशाची प्रमुख पेट्रोलियम कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (सीपीसी) द्वारे इंधनाचे दर वाढविण्याची शक्यता असल्याने गुरुवारपासून देशातील अनेक भागात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागत आहेत.

‘ही’ विदेशी बँक खरेदी करण्याची शर्यत; HDFC, अॅक्सिस, कोटक महिंद्रा यांमध्ये जोरदार स्पर्धा
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या ते ८५ डॉलरच्या जवळ आहे. यामुळे श्रीलंकेला तेल आयात करण्यात अडचण येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत देशातील तेलाची देयके ४१.५ टक्क्यांनी वाढून २ अब्ज डॉलर्स झाली आहेत. अर्थमंत्री तुलसी राजपक्षे यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे देशाच्या पर्यटन आणि रेमिटन्सच्या कमाईवर परिणाम झाला असल्याने लंकेला तीव्र परकीय चलन संकटाचा सामना करावा लागत आहे.

कर्ज घेताय… वैयक्तिक आणि पीपीएफ लोनमध्ये काय आहे स्वस्त?
आर्थिक आणीबाणीची घोषणा
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आर्थिक आणीबाणी जाहीर केली होती. सतत वाढणाऱ्या महागाईमुळे त्यांनी हे पाऊल उचलले. देशाच्या चलनाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडत आहेत.

पर्यटन आणि चहाच्या निर्यातीवर टिकून आहे अर्थव्यवस्था
श्रीलंकेची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटन आणि चहा निर्यातीवर अवलंबून आहे. महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. राजपक्षे म्हणाले की, बाह्य संकटांव्यतिरिक्त देशांतर्गतही अनेक संकटे आहेत. त्यामुळे देशाचा महसूल कमी होत आहे, तर खर्च सातत्याने वाढत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: