बाळशास्त्री जांभेकर शतकोत्तर अमृत महोत्सवी पुण्यतिथी निमित्त पत्रकार प्रबोधन वर्ष

बाळशास्त्री जांभेकर शतकोत्तर अमृत महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त पत्रकार प्रबोधन वर्ष Journalist Prabodhan Year on the occasion of Balshastri Jambhekar Centenary Amrit Mahotsavi Punyatithi
बाळशास्त्री जांभेकरांची 175 वी पुण्यतिथी पोंभुर्ले येथे साध्या पद्धतीने साजरी होणार : रविंद्र बेडकिहाळ

फलटण,दि.14 – महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व पोंभुर्ले ग्रामपंचायत,जांभे देऊळवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 175 व्या पुण्यतिथीचा 17 मे रोजी पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात दरवर्षीप्रमाणे होणारा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात लागू असणार्‍या निर्बंधांमुळे साध्या पद्धतीने संपन्न होणार आहे. जांभे – देऊळवाडी येथील ज्येष्ठ नेते शांताराम गुरव, पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सादिक डोंगरकर व देवगड तालुका शिवसेना प्रमुख अ‍ॅड.प्रसाद करंदीकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन एवढाच कार्यक्रम होईल, असे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी जाहीर केले आहे.

शतकोत्तर अमृत महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी राबवणार ‘पत्रकार प्रबोधन वर्ष’
  बाळशास्त्री जांभेकरांच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी पुण्यतिथीच्या निमित्ताने हे वर्ष महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे ‘पत्रकार प्रबोधन’ वर्ष म्हणून विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. त्याचा एक भाग म्हणून 17 मे 2021 रोजी राज्यातील सर्व मराठी वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांची कार्यालये,शिक्षणसंस्था व वाचनालये, सार्वजनिक संस्था यांमधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्रास आदरांजली वाहून या ‘पत्रकार प्रबोधन’ वर्षाचा शुभारंभ कोवीड 19 चे सर्व शासन निर्देश पाळून करावा,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.


बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्याचे स्मरण म्हणून या शतकोत्तर अमृत महोत्सवी पुण्यतिथी निमित्त आयोजित ‘पत्रकार प्रबोधन वर्षात’ पत्रकारांचे आरोग्य प्रशिक्षण, ग्रामीण पत्रकारांचे प्रश्‍न, महाराष्ट्राच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त 1960 नंतरची पत्रकारिता आणि महाराष्ट्र, ज्येष्ठ वयोवृद्ध पत्रकारांचे अत्यावश्यक प्रश्‍न, महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाची परंपरा, माध्यमांसमोरील आव्हाने अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्रे, परिसंवाद, मुलाखती, कार्यशाळा आदी कार्यक्रम कोवीड 19 च्या परिस्थितीनुसार ‘ऑनलाईन’ अथवा समारंभपूर्वक आयोजित केले जातील. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करतील.

या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सर्व प्रकारच्या माध्यमांमधील पत्रकारांनी सहकार्य करावे व काही सूचना असतील तर mpkn87@gmail.com या ई-मेल वर अथवा संस्थेचे विश्‍वस्त अमर शेंडे यांच्या 9922778386 या क्रमांकावर कळवाव्यात,असे आवाहनही संस्थेच्यावतीने केले आहे. 

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: