आर्यन खान प्रकरणात साक्षीदारांच्या कोऱ्या कागदावर सह्या; संजय राऊत म्हणाले…


हायलाइट्स:

  • आर्यन खान प्रकरणात मोठा गौप्यस्फोट
  • के.पी गोसावीच्या बॉडिगार्डचा खळबळजनक दावा
  • संजय राऊतांनी केलं महत्त्वाचं ट्वीट

मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी ३ ऑक्टोबरपासून अटकेत आहे. या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा दावा. एका व्यक्तीने केला आहे. हा व्यक्ती के. पी गोसावी याचा बॉडीगार्ड आहे. आता या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे.

मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर ज्यारात्री छापेमारी झाली तेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत के. पी गोसावीदेखील होत्या. त्या छापेमारीनंतर पंचनामा म्हणून एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या, असा दावा प्रभाकर सेल यानं केला आहे. तसंच, यावेळी पैशांचा व्यवहार झाल्याचंही म्हटलं आहे. यावर बोट ठेवत संजय राऊत यांनी एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे.

वाचाः आर्यन खान प्रकरणात कोट्यवधींची डील? खळबळजनक व्हिडिओतून दावा

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात एनसीबीने साक्षीदारांना कोऱ्या कागदांवर सह्या करायला लावल्या हे धक्कादायक आहे. तसंच, या प्रकरणात मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचंही म्हटलं आहे. हे महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा संशय आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मत आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही संजय राऊत यांनी या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे. तसंच, या प्रकरणी पोलिसांनी दखल घेण्याची मागणीही राऊतांनी केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: