फिनो पेमेंट्स बँंकेचा IPO ; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या पूर्ण योजनेचा पूर्ण तपशील


हायलाइट्स:

  • आयपीओ २९ ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार
  • २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल
  • कंपनी ३०० कोटींचे शेअर विक्री करणार आहे.

पुणे : आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडचा (Fino Payments Bank) आयपीओ २९ ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार असून २ नोव्हेंबर रोजी बंद होईल. या आयपीओ अंतर्गत ३०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स विक्री केले जातील. याव्यतिरिक्त, फिनो पे-टेक लिमिटेड ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत १.५६ कोटी इक्विटी समभागांची विक्री करेल.

म्युच्युअल फंड गुंतवणूक; जाणून घ्या आयटीआय फार्मा आणि हेल्थकेअर फंडाबाबत
सध्या, फिनो पेटेकचा कंपनीमध्ये १०० टक्के हिस्सा आहे. १२ नोव्हेंबर रोजी एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होण्याची कंपनीची योजना आहे. फिनो पेमेंट बँकेत ब्लॅकस्टोन, आयसीआयसीआय (ICICI) ग्रुप, भारत पेट्रोलियम आणि आयएफसी (IFC) सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे.

दिवाळी बोनस मिळालाय; पैशांचा योग्य वापर केल्यास मिळतील हे फायदे
आयपीओ फंडाचे काय करणार?
या आयपीओ अंतर्गत मिळणारी रक्कम भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल. या अंतर्गत कंपनीचा टियर-१ भांडवल आधार वाढवला जाईल. कंपनीचे टियर-१ भांडवल प्रमाण आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ५६.२५ टक्के होते.

कर्ज घेताय… वैयक्तिक आणि पीपीएफ लोनमध्ये काय आहे स्वस्त?
कंपनीबद्दल जाणून घ्या
ही एक वाढणारी फिनटेक कंपनी आहे, जी विविध प्रकारची आर्थिक उत्पादने आणि सेवा देते. या कंपनीचे लक्ष प्रामुख्याने डिजिटल आणि पेमेंट संबंधित सेवांवर आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे मार्च २०२१ पर्यंत सुमारे ४३.४९ कोटी व्यवहार झाले. या सर्व व्यवहारांचे एकूण मूल्य १.३३ लाख कोटी रुपये होते. कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये त्याचे एकूण उत्पन्न ७९१.०३ कोटी रुपये होते. जे गेल्या वर्षी ६९१.४० कोटी रुपये होते. या कालावधीत कंपनीचा नफा २०.४७ कोटी रुपये होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: