आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? शिवसेना नेत्याने दिली प्रतिक्रिया


हायलाइट्स:

  • महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवणार असल्याचं मुश्रीफ यांचं वक्तव्य
  • शिवसेनेनंही जाहीर केली भूमिका
  • काय म्हणाले शिवसेना नेते राजेश क्षीरसागर?

कोल्हापूर : पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. मुश्रीफ यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘हसन मुश्रीफांच्या या वक्तव्याचं स्वागतच आहे पण, मातोश्रीच्या आदेशानुसार शिवसेना आगामी निवडणुकीत वाटचाल करेल,’ असं शिवसेना नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. याबाबत क्षीरसागर यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

‘महाविकास आघाडीची स्थापना होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. ते कार्यकाल पूर्ण करेल, यात काडीमात्र शंका नाही. आगामी काळात होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेसह अनेक निवडणुकांच्या बाबतीत शिवसैनिक “मातोश्री” च्या आदेशास बांधील असतील. शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेवूनच पक्ष आदेश देतील त्याप्रमाणे पुढील निवडणुकीत शिवसेनेची वाटचाल असणार आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या बाबतीत उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडून कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही,’ अशी माहितीही राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

…म्हणून मोदी सरकार पेट्रोलचे दर कमी करणार नाही : पृथ्वीराज चव्हाण

‘शिवसेनेचा पहिला महापौर करण्यास सज्ज व्हा’

‘मागच्या दोन्ही महानगरपालिका निवडणुकींचा आढावा घेतला तर दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे २० ते २५ उमेदवार दोन नंबरला असल्याचं पहावयास मिळते. प्रत्येक प्रभागात शिवसेनेची ताकत आहे. त्यामुळे बदलेल्या त्रिसदस्यीय प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर आहे. गेल्या काही निवडणुकांत शेवटच्या दोन दिवसात होणाऱ्या आर्थिक घडामोडींमुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव होत होता. पण, या प्रभाग रचनेमुळे शिवसेनेच्याच उमेदवारांचे पारडे जड राहणार आहे. त्यामुळे आसपासच्या प्रभागातील इच्छुकांनी एकसंघ होवून कामाला लागावे. पदाधिकाऱ्यांनी मतदार नोंदणीसह इतर माध्यमातून जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचवावे. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कामाला लागा. शिवसेनेचा पहिला महापौर करण्यास सज्ज व्हा,’ अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकारी यांना या पत्रकाद्वारे केल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: