करकंब येथे महात्मा आनंद स्वामी सरस्वती स्मृती दिन साजरा

करकंब येथे महात्मा आनंद स्वामी सरस्वती स्मृती दिन साजरा
करकंब /मनोज पवार - DAV महात्मा आनंद स्वामी सरस्वती आर्ट/सायन्स ज्यु.काॅलेज व रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब यांच्यावतीने महात्मा आनंद स्वामी सरस्वती यांचा 44 वा स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

 या कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते  स्व.रुक्मिणीताई आरोळे शिष्यवृत्तीचे चेक वाटप करण्यात आले.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.श्रीकांत  महाराज आरोळे,प्रमुख पाहुणे प्रशालेचा माजी विद्यार्थी अमित बेंबळकर(कृषी अधिकारी, सेंट्रल बॅंक पंढरपूर) शालेय  व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण वंजारी, संजय मोहिते, अमरसिंह चव्हाण, मनोज पवार, संजय धोत्रे, मारुती व्यवहारे सर, सतीश रणे, प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम यांच्या उपस्थितीत स्व.रुक्मिणीताई आरोळे शिष्यवृत्ती धोंगडे व आरोळे परिवाराच्यावतीने शिष्यवृत्ति वाटप करून पुण्यस्मृती साजरा करण्यात आली.

यावेळी प्राचार्य हेमंत कदम यांनी महात्मा आनंद स्वामी सरस्वती यांच्या जीवनावर आधारित करकंब येथील प्रशालेस 1962 साली दिलेली भेट, प्रशालेचे जुनी इमारतीस पायाभरणी समारंभ, मुलींचे शिक्षण,गायत्री मंत्रांचा उपासक विविध आंदोलने इत्यादीची माहिती सांगितली.स्काऊट शिक्षक एम.के.पुजारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना गायत्री मंत्राचे पठण व महत्व सांगितले.

     उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धर्मे वैष्णवी दत्तात्रय सोनकांबळे ,आरती सतीश मुखरे ,प्राची राजू पवार,अमृता भीमराव देवकते ,पायल शहाजी (जळोली) या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी 6174 रू शिष्यवृत्ति चेक देण्यात आले.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण वंजारी यांनी मनोगत व्यक्त केले.

   यावेळी बोलताना ह.भ.प.श्रीकांत आरोळेमहाराज यांनी प्रशालेत यापुढे आठवी ते दहावी प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना 100000रू (एक लाख) ठेव बक्षिसपर रक्कम ठेवणार असल्याचे जाहीर केले. प्रशालेचे पर्यवेक्षक धनवंत करळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: