IND vs PAK : पाकिस्तानला एकटाच भिडला विराट कोहली, भारताने किती धावांचे आव्हान दिले पाहा…


दुबई : पाकिस्तानविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात जिथे रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव एकामागून एक धारातीर्थी पडले तिथे भारताचा कर्णधार विराट कोहली एकटाच भिडल्याचे पाहायला मिळाले. विराटने यावेळी ४९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५७ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. विराटच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला पाकिस्तानपुढे १५२ धावांचे आव्हान ठेवता आले.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले. भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिल्या षटकात मोठा धक्का बसला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने यावेळी रोहितला पायचीत पकडत संघाला पहिले यश मिळवून दिले. रोहितला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. रोहितनंतर भारताचा दुसरा सलामीवीर लोकेश राहुलही लवकरच बाद झाला. आफ्रिदीनेच यावेळी राहुलला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. राहुलला यावेळी तीन धावांवर समाधान मानावे लागले. भारताने दोन्ही सलामीवीर गमावल्यावर कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमार यादव आक्रमक फलंदजी करत होता, पण तो ११ धावावंर असताना त्याला हसन अलीने बाद केले आणि ही जोडी फुटली.

भारताची ३ बाद ३१ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी कोहलीच्या मदतीला रिषभ पंत धावून आला. कोहली आणि पंत यांनी यावेळी चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची महत्वाची भागीदारी रचली. ही जोडी आता भारताला मोठी धावसंख्या उभारून देईल, असे वाटत होते. पण यावेळी पाकिस्तानच्या शाबाद खानने पंतला बाद करत ही जोडी फोडत भारताला मोठा हादरा दिला. पंतने यावेळी ३० चेंडूंमध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३९ धावांची खेळी साकारली. पंत बाद झाला असला तरी कोहलीने मात्र आपली फटकेबाजी सुरुच ठेवत अर्धशतक झळकावले. एकामागून एक फलंदाज बाद होत असले तरी विराट खेळपट्टीवर टिकून राहीला आणि अर्धशतक झळकावत भारताला सावरण्याचे काम केले. पंत बाद झाल्यावर कोहलीला रवींद्र जडेजाची चांगली साथ मिळाली. पण यावेळ जडेजा १३ धावांवर बाद झाला आणि भारताला पाचवा धक्का बसला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: