अन्यथा शिवभक्त राज्यभर आंदोलन करतील -शिवक्रांती युवा संघटना संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे

अन्यथा शिवभक्त राज्यभर आंदोलन करतील -शिवक्रांती युवा संघटना संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे Otherwise, Shiva devotees will agitate all over the state – Dattatraya Kale, Founder President of Shivkranti Youth Organization
केला महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध

पंढरपूर ,14/05/2021 – छत्रपती शंभूराजे यांची आज 364 वी जयंती आहे.शिवप्रेमींसाठी शंभू भक्तासाठी हा सुवर्ण दिवस मानला जातो. परंतु महाराष्ट्र शासनाला छत्रपती शंभू राजांचा विसर पडलेला दिसत आहे .

  दरवर्षी महाराष्ट्र शासन डिसेंबरच्या शेवटी एक परिपत्रक काढते त्या परिपत्रकामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी तारखेवर तिथीप्रमाणे दिलेले असते पण चालू 2021 सालचे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक काढलेले आहे ,त्या परिपत्रकामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीचा उल्लेख नाही ही खूप निंदनीय गोष्ट आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने ही घोडचूक त्यांच्या हातून झालेली आहे त्यांनी ती सुधारावी आणि शिवभक्तांची जाहीर माफी मागावी अन्यथा शिवभक्त राज्यभर आंदोलन करतील असा इशारा शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  दत्तात्रय काळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: