Video : रिस्पेक्ट! इतिहास रचल्यानंतर धोनीपुढे हाथ बांधून उभे राहिले पाकिस्तानी खेळाडू


दुबई : विश्वचषकात भारताला पहिल्यांदा पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही. संपूर्ण संघ ज्या प्रकारे सेलिब्रेशन करत होता, त्यावरून त्यांच्यासाठी हा विजय विश्वचषकापेक्षाही अधिक महत्त्वाचा असल्याचे दिसून आले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना अत्यंत तणावपूर्ण वातावरणात होतो, पण सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानावर येत भारतीय खेळाडूंशी चर्चा केली.

वाचा-पाकिस्तानी पत्रकाराचा प्रश्न ऐकून, विराटच्या तळपायाची आग मस्तकात गेली; पाहा Video

एक खेळाडू ज्याची पाकिस्तानी क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक क्रेझ आहे, तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. नाव आहे महेंद्रसिंह धोनी. फॅनमध्ये मग तो बाबर आझम असो किंवा शोएब मलिक, इमाद वसीम असो किंवा नव्याने आलेला फॅनबॉय शाहनवाज धानी… प्रत्येकजण धोनीशी बोलण्यासाठी उत्सुक होता. माहीने देखील कोणालाही निराश केले नाही.

शाहनवाज धानी आहे धोनीचा मोठा चाहता
रविवारी रात्री शाहनवाज धानीच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिला नव्हता. त्याच्या संघाने पहिल्यांदाच विश्वचषकात भारताचा पराभव केला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला महेंद्रसिंह धोनीला भेटण्याची संधी मिळाली. धोनीने आपल्या पाकिस्तानी चाहत्याला निराश केले नाही. दोघांनी काही वेळ एकमेकांशी चर्चा केली आणि नंतर फोटोसाठी पोझ दिली. सरावावेळीही शाहनवाजने धोनीचे लक्ष वेधले होते.

बाबरला धोनीसोबतची चर्चा कायम लक्षात राहील
बाबर आझम निःसंशयपणे सध्याच्या अव्वल तीन फलंदाजांपैकी एक आहे. कर्णधार म्हणून त्याच्या संघाने भारताला पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेत पराभूत केले. आझमच्या नेतृत्वाखाली घडलेला पराक्रम १९९२ साली विश्वचषक जिंकणारा इम्रान खान (सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान) यांचा संघही करू शकला नाही. भारताचा पराभव केल्यानंतर बाबरने धोनीला अनेक प्रश्न विचारले. धोनीनेही त्याची उत्तरे दिली. धोनीने जे काही सांगितले असेल, ते तेथे उपस्थित असणाऱ्या चार-पाच जणांव्यतिरिक्त कुणाला माहित नाही, पण हे निश्चित आहे की, धोनीने जे काही सांगितले असेल ते पाकिस्तानी क्रिकेटपटू कधीही विसरू शकणार नाहीत.

धोनीसमोर विद्यार्थ्यासारखे उभे राहिले पाकिस्तानी खेळाडू
धोनीला भारतीय संघाचा मेंटर म्हणून यूएईला पाठवण्यात आले आहे. सामना संपल्यानंतर त्याने पाकिस्तानी खेळाडूंनाही टिप्स दिल्या. धोनी पाकिस्तानी खेळाडूंशी चर्चा करत असताना बाबर आझम, शोएब मलिक, इमाद वसिम हे एका विद्यार्थ्याप्रमाणे हाथ बांधून धोनी काय सांगतोय ते ऐकत होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: