बायकोनं मारलं तरी सांगतील की यात केंद्र सरकारचा हात आहे, फडणवीसांचा खोचक टोला


हायलाइट्स:

  • देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फडणवीसांची टीका
  • नांदेडमध्ये बोलत होते देवेंद्र फडणवीस

नांदेडः ‘महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षांपासून विकास नव्हे तर भ्रष्टाचार करत आहेत. हे सरकार इतकं लबाड आहे की काही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतं. मी तर असे म्हणेल की, यांच्या बायकोनं मारलं तरी यात केंद्राचा हात आहे असं म्हणतील,’ अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देगलूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज नांदेडमध्ये होते. यावेळी सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच, ‘राज्याने गेल्या दीड वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती बघितल्या. वादळ, अतिवृष्टी, महापूर या सगळ्यामुळं राज्याचं आतोनात नुकसान झालं. याची झळ मुख्यतः राज्यातल्या शेतकऱ्याला बसली आहे. या शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसेही व्यवस्थित दिले गेले नाही. हे सरकार लबाड आहे. काहीही झालं की केंद्राला जबाबदर धरतं’, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाचाः वानखेडेंवर लाचखोरीचा आरोप; मुंबई पोलीस नोंदवणार साईलचा जबाब?

‘राज्यातील सरकारला अद्याप पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. संपूर्ण राज्यासाठी फक्त ७०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. आपलं सरकार होतं तेव्हा मराठवाड्याच्या एका जिल्ह्याला ५०० कोटी रुपयांची मदत केली होती. राज्य सरकार भ्रष्टाचार करत आहे. हे लबाड सरकार आहे. भागवत कराड यांनी विमा कंपन्याची बैठक घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. विमा कंपन्यानी त्यांना सांगितलं की, राज्य सरकारनं त्यांच्या वाट्याचे सतराशे कोटी रुपये भरले नाहीत. तर आम्ही कसे पैसे देऊ. राज्य सरकारने आपल्या वाट्याचे पैसे भरले असते तर आम्ही ४ हजार कोटी रुपये दिले असते,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाचाः विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोनं जोडणार; गडकरींची मोठी घोषणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: