चार सत्रांनंतर पडझड थांबली; आज सेन्सेक्स-निफ्टी वधारले, या शेअरमध्ये तेजीची लाट


हायलाइट्स:

  • आज सोमवारी शेअर बाजारात तेजी परतली.
  • गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीला प्राधान्य दिल्याने आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली.
  • आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एसबीआय, टेक महिंद्रा, डॉ. रेड्डी लॅब, महिंद्रा अँड महिंद्रा , एचयूएल, सन फार्मा आदी शेअर वधारले

मुंबई : भांडवली बाजारातील घसरणीला आज ब्रेक लागला. आज सोमवारी शेअर बाजारात तेजी परतली. गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीला प्राधान्य दिल्याने आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली. आज बँकिंग क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला.

इंधन दर ; पाच दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
बाजार बंद होताना सेन्सेक्स १४५ अंकांनी वधारला आणि ६०९६९ अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये मात्र १० अंकांची किरकोळ वाढ झाली आणि निफ्टी १८१२५ अंकावर स्थिरावला.आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था या शेअरमध्ये तेजी दिसून आली. दुपारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकात घसरण झाली होती. मात्र बँकांच्या शेअरने पडझड रोखली. आज आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एसबीआय, टेक महिंद्रा, डॉ. रेड्डी लॅब, महिंद्रा अँड महिंद्रा , एचयूएल, सन फार्मा आदी शेअर वधारले.

ट्रम्प यांचे नाव जोडताच मिळाला सोन्याचा भाव ; तब्बल १६५७ टक्क्यांनी वधारलाय ‘हा’ शेअर
सेन्सेक्स मंचावरील २२ शेअर घसरणीसह बंद झाले. ज्यात एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, एल अँड टी, टाटा स्टील, भारती एअरटेल, इन्फोसिस, रिलायन्स, एनटीपीसी, आयटीसी, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, टाटा स्टील या शेअरमध्ये घसरण झाली. निफ्टी ५० शेअरमध्ये ११ शेअर वधारले तर उर्वरित ३९ शेअरमध्ये घसरण झाली.

स्मार्ट गुंतवणूक; मल्टी असेट श्रेणीत ‘या’ योजनेने दिला दमदार परतावा
नुकताच शेअर बाजारात लिस्ट झालेल्या तत्व चिंता फार्माच्या शेअरमध्ये आज १७ टक्क्यांची वाढ झाली. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ३२ कोटींचा नफा मिळाला. नफ्यात ४० टक्के वाढ झाली. या दमदार कामगिरीमुळे कंपनीचा शेअर १७ टक्क्यांनी वधारून २४८८.९० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. मागील ५२ आठवड्यातील ही त्याची सर्वोच्च पातळी ठरली.

आजच्या सत्रात बँकिंग क्षेत्र वगळता विक्रीचा दबाव दिसून आला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात गेल्या आठवड्यात जोरदार विक्री केली होती. दुसऱ्या तिमाहीचे निकाल विशेष म्हणजे धातू, ऊर्जा, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली. त्यामुळे आज खरेदीकडे गुंतवणूकदार वळला असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक तज्ज्ञ डॉ. व्ही के विजयकुमार यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: