हिरो सायकल्सचा IPO येणार ; पंकज मुंजाळांनी सांगितला कंपनी विस्ताराचा प्लॅन


हायलाइट्स:

  • पंकज मुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील हिरो सायकल्स ही कंपनी एचएमसी ग्रुप – हिरो मोटर्स कंपनीचा (HMC Group) भाग आहे.
  • ही कंपनी आता आपली जागतिक ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
  • हिरो सायकल्स युरोपियन बाजारातील अव्वल पाच सायकल उत्पादकांच्या गटामध्ये स्थान मिळवू पाहत आहे.

नवी दिल्ली :हिरो सायकल्स या जगातील सर्वात मोठ्या सायकल उत्पादक कंपनीने पुढील दोन वर्षांसाठी आपल्या व्यवसाय विस्ताराची योजना तयार केली आहे. या योजनांनुसार हिरो सायकल समूह कंपन्यांमध्ये हिस्सेदारीची विक्री, इतर कंपन्यांचे अधिग्रहण आणि आयपीओ (IPO) यांचा समावेश आहे.

ट्रम्प यांचे नाव जोडताच मिळाला सोन्याचा भाव ; तब्बल १६५७ टक्क्यांनी वधारलाय ‘हा’ शेअर
पंकज मुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील हिरो सायकल्स ही कंपनी एचएमसी ग्रुप – हिरो मोटर्स कंपनीचा (HMC Group) भाग आहे. ही कंपनी आता आपली जागतिक ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कंपनीला युरोपियन बाजारपेठेत आपले बस्तान बसवायचे आहे. हिरो सायकल्स युरोपियन बाजारातील अव्वल पाच सायकल उत्पादकांच्या गटामध्ये स्थान मिळवू पाहत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हिरो सायकल्सचा ठसा उमटविण्यासाठी तयार असून भारताबाहेरील दोन कंपन्या खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या दोन कंपन्याचे अधिग्रहण केल्यानंतर हिरो सायकल्स ग्रुप भागविक्रीद्वारे २०० दशलक्ष डॉलर उभारण्याची प्रक्रिया सुरू करेल.

इंधन दर ; पाच दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
पंकज मुंजाळ म्हणाले की, ते हिरो इंटरनॅशनल, फायरफॉक्स आणि हिरो मोटर्सचे एकत्रित विलीनीकरण करण्यासाठी पर्याय शोधत आहेत. हे विलीनीकरण २०-२५ टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही. सध्या हिरो सायकल्सच्या उलाढालींपैकी ५० टक्के उलाढाल भारताबाहेर होते. २०१५ मध्ये हिरोने मँचेस्टरस्थित इनसिंक बाईक्स विकत घेतली. त्यानंतर कंपनीने वर्ष २०२० मध्ये जर्मन ई-बाइक उत्पादक एचएनएफ निकोलईचे (HNF Nicolai) अधिग्रहण केले. निकोलाईचे (HNF Nicolai) मध्ये ४८ टक्के स्टेक हिरोने विकत घेतले आहेत.

स्मार्ट गुंतवणूक; मल्टी असेट श्रेणीत ‘या’ योजनेने दिला दमदार परतावा
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हिरोची पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी सायकल उद्योगातील दिग्गज जेफ वेस यांची लंडनस्थित हिरो इंटरनॅशनलचे सीईओ म्हणून या वर्षी मे महिन्यात नियुक्ती केली. हिरो सायकल्सने इंग्लंड, जर्मनी आणि स्लोव्हाकियामध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच जगातील अनेक मोठ्या सायकल उत्पादक कंपन्या त्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहितीही मुंजाळ यांनी दिली.

आयपीओ आणण्याची योजना (हिरो सायकल्स IPO)
पंकज मुंजाळ यांचे चुलत भाऊ पवन मुंजाळ यांची कंपनी हिरो मोटोकॉर्प स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे. हिरो मोटोकॉर्प ही देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. आयपीओ बाबत अद्याप कोणतीही टाइमलाइन सांगता येणार नाही, परंतु २०२४ पर्यंत याबाबत बरेच काही घडू शकते. हिरो सायकल्स ही सार्वजनिक कंपनी बनविण्याचा विचार करत असल्याचे पंकज मुंजाळ यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: