भारतीय जैन संघटना आयोजित गृहणी ते उद्यमी महिलांसाठी ऑनलाईन कार्यशाळा

भारतीय जैन संघटना आयोजित गृहणी ते उद्यमी रविवार रोजी महिलांसाठी ऑनलाईन कार्यशाळा- मॅनेजमेंट गुरु राकेश जैन Online workshop for housewives to women entrepreneurs organized by bhartiya Jain sanghatna

सोलापूर – भारतीय जैन संघटना तर्फे येत्या रविवारी दि. 16 मे 2021 रोजी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत सर्व महिलांसाठी उद्योग व्यवसायाबद्दल देश पातळीवरील प्रख्यात मॅनेजमेंट गुरु राकेश जैन ,इंदोर हे निःशुल्क राज्यस्तरीय आँनलाईन मार्गदर्शन करतील, अशी माहिती राज्य उपाध्यक्ष सोलापूर येथील केतनभाई शहा यांनी दिली आहे.

  अगोदर एकत्रीत कुटूंब राहत होते. सध्या अधिकांश कुटूंब हे स्वतंत्र व सिमित लोकांचे राहिले आहे. महागाईच्या काळात परिवाराचे उदर-निर्वाह चालविणे फार अवघड झाले आहे. त्यात ह्या कोरोनाचे व लॉकडाऊनचे संकट यामुळे  परिवाराचे जगणे कठीण झाले आहे.शासकिय व खाजगी नौकरी मिळणे अवघड झाले आहे.त्यामुळे महिलांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे लघु उद्योग, लहान-मोठे व्यवसायात पुढे येऊन स्वावलंबी व्हावे ह्या उद्देशाने “गृहणी ते उद्यमी” ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .

   यात राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना, महिलांना उद्योग व्यवसायासाठी नाममात्र व्याजाने कर्ज तसेच अनुदान कसे मिळेल, महिलांनी चुल आणि मुल या संकल्पनेवर मर्यादित न राहता उद्योग व्यवसायात पुढे येऊन आपल्या कुटूंबाची प्रगती कशी साधावी या संदर्भात अनेक मार्मिक मंत्रा द्वारे मॅनेजमेंट गुरु राकेश जैन हे सखोल मार्गदर्शन करतील.या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी झुम व्हिडिओ अ‍ॅपची आय. डी. 848 9363 6559 व पासवर्ड 867814 किंवा फेसबुक लाईवद्वारे www.facebook.com/ 107271904558863/live/ जॉईन होऊ शकतात. या कार्यशाळेची पुर्वतयारी राज्याध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या सौ.संतोष बंब,सौ.सरला दुधेडिया, सौ.कांचन संघवे, सौ.सुवर्णा कटारे,सौ माया पाटील,सौ कामिनी गांधी,सौ प्रविणा सोलंकी,सौ पंकजा पंडित,राज्य सचिव अभय सेठिया, प्रभारी नंदकिशोर साखला,शाम पाटील, अभिनंदन विभूते,प्रविणकुमार बालदोटा, देशभूषण वसाळे आदी परिश्रम घेत आहेत. 

 तरी राज्यातील व जिल्ह्यातील उद्योग,व्यवसाय क्षेत्रातील इच्छुक महिलांनी प्रख्यात मॅनेजमेंट गुरु राकेश जैन यांचा निःशुल्क मार्गदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन हस्तीमल बंब, केतन शहा,सौ.संतोष बंब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: