asaduddin owaisi : ‘भारताच्या टीममध्ये ११ खेळाडू, पण फक्त मुस्लिम खेळाडूलाच का टार्गेट केलं जातंय?’, ओवैसी संतप्त


हैदराबादः एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी ( asaduddin owaisi ) हे भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या ( mohammed shami) बचावासाठी पुढे आले आहेत. टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर शमीला सोशल सोशल मीडियावर लक्ष्य केलं जात आहे. यातून मुस्लिमांविरुद्धचा द्वेष दिसून येतो. भाजप सरकारने अशांवर टीका करावी, अशी मागणी ओवैसी यांनी केली. रविवारी झालेल्या टी -२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानशी झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला.

मोहम्मद शमीसंबंधी ओवैसी यांनी ट्विट केलं आहे. ‘भारताच्या पराभवावरून मोहम्मद शमीला सोशल मीडियावर टार्गेट केलं जात आहे. यातून मुस्लिमांविरुद्धची कट्टरता आणि द्वेष दिसून येतोय. क्रिकेटमध्ये हार-जीत होत असते. संघात ११ खेळाडू असले तरी फक्त एका मुस्लिम खेळाडूला टीकेचं लक्ष्य करण्यात आलं आहे. भाजप सरकारचा याचा निषेध करणार की नाही?, असा सवाल ओवैसींनी या ट्विटमधून उपस्थित केला आहे.

भारताचा १० गडी राखून पराभव

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. यानंतर भारतीय क्रिकेट प्रेमींनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करण्यास सुरवात केली. यातील काहींनी मोहम्मद शमीला ट्रोल करण्यास सुरवात केली. सेहवागसह अनेक क्रिकेटपटूही शमीच्या बचावासाठी आले आहेत. आता ओवैसींनी या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देत केंद्रातील मोदी सरकारवर अशा प्रकारांची टीका करावी, अशी मागणी केली आहे.

sameer wankhede : समीर वानखेडे दिल्लीला रवाना, अटक टाळण्यासाठी मुंबईतून बदली होणार?

मोहम्मद शमीवर का झाले आरोप?

कोहलीने शमीला गोलंदाजी करण्यासाठी १८वे षटक दिले होते. त्यावेळी पाकिस्तानला १८ षटकांमध्ये १७ धावांची गरज होती. शमीच्या १८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझावानने षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर रिझवानने चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. या षकाच्या चौथ्या चेंडूवर रिझवानने एकेरी धाव घेतली आणि पाचव्या चेंडूवर बाबर आझमने दुहेरी धाव घेत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शमीने या पाच चेंडूंमध्ये सर्व १७ धावा दिल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळेच शमीवर फिक्सिंगचे आरोप चाहत्यांनी सोशल मीडियावर केले आहेत.

sameer wankhede : समीर वानखेडेंना झटका! चौकशी होणार, दिल्लीतील अधिकारी येणार, सूत्रांची माहिती

सहवागने शमीला दिले प्रोत्साहन

माजी सलामीवीर वीरेंद्र सहवागने सोमवारी या मुद्द्यावर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं समर्थन केलं आहे. ‘मोहम्मद शमीवर झालेला ऑनलाइन हल्ला धक्कादायक आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आहोत. तो चॅम्पियन आहे आणि जो कोणी भारताची टोपी घालतो त्याच्या हृदयात कोणत्याही ऑनलाइन गर्दीपेक्षा जास्त भारत असतो. आम्ही तुझ्यासोबत आहोत शमी. पुढच्या सामन्यात जलवा दाखव, असं ट्विट विरेंद्र सहवागने केलं आहे.

Ind Vs Pak: पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव, हॉस्टेलमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्लाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: