अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न

अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti celebrated on behalf of Akhil bhartiy Maratha mahasangh

पंढरपूर-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर यांच्यावतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी परिसर संभाजी महाराज यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

     यावेळी पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर ,उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर,नगरसेवक प्रशांत शिंदे,मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शाम साळुंखे,शहर संघटक काका यादव,विभाग प्रमुख पांडुरंग शिंदे,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,मालवाहतूक संघटना उपाध्यक्ष सोमनाथ झेंड,छावा क्रांतीविर संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज लटके,छावा संघटनेचे सोपानकाका देशमुख यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: