भाजपची संघटनात्मक बैठक व नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्याकडून 10 लक्ष रुपयांचा धनादेश

पुणे भाजपची संघटनात्मक बैठक व नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्याकडून 10 लक्ष रुपयांचा धनादेश
पुणे,25/10/2021 - भारतीय जनता पक्षाची पुणे शहराची संघटनात्मक बैठक भाजपा पुणे  शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या बैठकीत संघटनात्मक आढावा,आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी, दिवाळी निमित्त आयोजित करावयाचे स्नेहमिलन कार्यक्रम तसेच भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराच्या नूतन कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याचे नियोजन अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

   आगामी काळातील महानगरपालिकेच्या निवडणुका संघटना म्हणून भारतीय जनता पार्टी साठी महत्वपूर्ण असून गेली साडेचार वर्ष भाजपाच्या नगरसेवकांनी जी जनहिताची कार्ये केलेली आहेत ती विविध माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावी तसेच बूथ समिती यंत्रणा अधिक सक्षम करावी अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

     यावेळी शहर कार्यालयासाठी नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे यांनी आपल्या 5 वर्षांच्या पगाराचा 10 लक्ष रुपयांचा धनादेश व संदिप काळे, योगेश पिंगळे यांनीही निधीचे धनादेश दिले.

   यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस गणेश घोष,दत्ताभाऊ खाडे,दिपक नागपुरे, संदिप लोणकर, बापू मानकर, स्वरदा बापट, योगेश बाचल,सचिन मोरे,संदिप दळवी,संतोष खांदवे, प्रमोद कोंढरे,पुनित जोशी,रवी साळेगावकर,महेश पुंडे, जितेंद्र पोळेकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: