मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Mission oxygen will make the state self-sufficient through oxygen self-sufficiency – Chief Minister Uddhav Thackeray

साखर उद्योगाने ऑक्सिजन उत्पादनात पुढाकार घेण्याची गरज

धाराशिव, 14/05/2021 – धाराशिव साखर कारखान्याचा देशातील पहिल्या साखर कारखान्याचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन व्हर्चुअलव्दारे करण्यात आले.

याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील ,आरोग्यमंत्री राजेश टोपे , उस्मानाबाद पालकमंत्री शंकरराव गडाख , खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील , शिखर बॅकेचे चेअरमन विद्याधर आनासकर , सदस्य अविनाश महागांवकर, जिल्हाधिकरी कौस्तुभ दिवेगावकर, VSI चे एस.व्ही.पाटील,मौज इंजिनिअरिंगचे ओकसाहेब, कागवाड, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थित व्हर्चुअल पद्धतीने उदघाटन सोहळा संपन्न झाला.

   यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray म्हणाले,देश कोरोनाच्या अडचणीचा सामना करत असताना, पुढची लाट देशाच्या उंबरठ्यावर आली असून केवळ ऑक्सिजन हेच कोरोनावरील औषध आहे असे असताना महाराष्ट्र राज्याने मिशन ऑक्सिजन चालू केले आहे.त्यात चेअरमन अभिजीत पाटील या तरुणाने मैलाचा दगड ठेवला आहे. सध्या देशात ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा आहे.आपल्या धाराशिव साखर कारखान्याचे नुकसान करून ऑक्सिजन निर्मिती केली ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. कारखान्याच्या सर्व सहकारी टीमचे मी मनापासून धन्यवाद मानतो तसेच अभिजीत पाटील यांनी येणाऱ्या काळात सर्व कारखानदारांना मार्गदर्शन करावे; आपण सर्व मिळून या परिस्थितीचा सामना नक्की करू असा विश्वास दिला. 

■ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin gadkari म्हणाले, चेअरमन अभिजीत पाटील यांनी आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला यासाठी लागणारे सर्व सामग्री त्यांनी १८दिवसात पूर्ण करून दाखवली त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. साखर कारखानदारी अडचणीत आली असताना देखील अभिजीत पाटील यांनी दाखवलेलं धाडस राज्यात नव्हेतर देशाला दिशा देण्याचं कार्य करेल.सर्व देश वासियांच्यावतीने खुप खुप त्याचं आभार मानतो.

■ उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar म्हणाले, ऑक्सिजनचा शोध घेण्याचा मार्ग सापडला आहे. धाराशिव साखर कारखान्याने यात बाजी मारली ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ३हजार मेट्रिक टन महाराष्ट्राचे उद्दिष्ट असून अभिजीत पाटील यांनी मार्गदर्शन करावं व इतर कारखान्याने त्यांची प्रेरणा घ्यावी. महाराष्ट्र राज्यात हा महत्व महत्वकांक्षी यशस्वी प्रयोग प्रयोग अभिजीत पाटील यांचा झालेला आहे.ज्या ज्या वेळेस देशावर संकट येतं त्या त्या वेळी शेतकरी व शेतकऱ्यांचा कारखाना व शेतकऱ्यांची लेकरं या देशाच्या मदतीसाठी धावून येतात हे आज अभिजीत पाटील यांच्या रूपात आज आपल्याला सर्वांसमोर दिसून आले आहे.महाविकास आघाडी सरकार अभिजीत पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

■ जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, देशाला दिशादर्शक पाऊल माझे मित्र अभिजीत पाटील यांनी टाकले असून महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे सर्व कारखान्यांसाठी हे अनुकरण करणे गरजेचे आहे. त्यांना लागणा-या सर्वच परवानगी देण्याचे आदेश दिले असून आपण ऑक्सिजन पुरवठा करावा.

■ आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले,आज इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मिती हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे. देश महाभयंकर संकटाचा मुकाबला करत असताना धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दाखवलेले हे धाडस खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.ते महाराष्ट्रा साठी दिशादर्शक आहे या प्रयोगाचे सर्व कारखानदारांनी अनुकरण करावे मी महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने त्यांचे खूप आभार मानतो.

■ पालकमंत्री शंकरराव गडाख म्हणाले,
उस्मानाबाद जिल्ह्यात होत असलेल्या ह्या देशातील पहिल्या इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तसेच अभिजीत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करून केवळ १८दिवसात हा प्रकल्प उभा केला त्याचं मनापासून अभिनंदन.

■ खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले,
उस्मानाबाद जिल्हाचे नाव देशात पोचवून ऑक्सिजनची निर्मिती करणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे पंढरीचा पांडूरंगच साक्षात धावून आल्याचं समाधान आज ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचं उदघाटन करताना वाटलं.

चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले, ज्यावेळी सर्व कारखानदारांची VSI मध्ये बैठक झाली त्यावेळी देशाचे नेते खासदार शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी हा प्रकल्प उभा करण्याचं धाडस दाखवलं. मी माझ्या कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प बंद ठेवून मौज इंजिनिअरिंग तसेच VSI च्या टेक्निकल सपोर्टमुळे व माझ्या संचालक मंडळ व सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहका-यांने केवळ १८ दिवसात हा प्रकल्प उभा केला. ज्या ज्या वेळेस अडचण आली त्यावेळी पालकमंत्री शंकरराव गडाख तसेच खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी सहकार्य केले.आज हा प्रकल्प उभा करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेतून मी समाजाची सेवा करत राहणार आहे असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *