बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात हिंसाचार; ६८३ जणांना अटक, मुख्य आरोपीकडून गुन्ह्याची कबुली


ढाका: बांगलादेशमध्ये नवरात्रौत्सवा दरम्यान झालेल्या हिंदू विरोधी दंगल प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू असून आणखी १३ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मामुन मंडल याला अटक केली. आरोपी मामुन मंडल हा इस्लामी छात्र शिवीर संघटनेचा कार्यकर्ता आहे. ही संघटना जमात-ए-इस्लामी या संघटनेची भ्रातृभावी संघटना आहे. त्याशिवाय स्थानिक मौलवी उमर फारुख यालाही रविवारी अटक करण्यात आली.

बांगलादेशमधील वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, पोलीस अधीक्षक विप्लव कुमार सरकार यांनी म्हटले की, मामुन २०१२ पासून छात्र शिवीर संघटनेत सक्रीय होता. त्यानंतर काही काळासाठी तो मलेशियात होता. उमर फारूख पीरगंज दक्षिण बस स्थानक मशिदीत इमाम होता.

बांगलादेश: दुर्गा पूजा मंडपात कुराण ठेवणाऱ्याची ओळख पटली; सीसीटीव्हीमुळे खुलासा
नवरात्रौत्सवा दरम्यान हिंदू मंदिरे, दुर्गा पूजा मंडपांची धर्मांध कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, नासधूस करण्यात आली होती. बांगलादेशमधील विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात हिंदू समुदायाच्या घरांवरही हल्ले करण्यात आले. या दंगलीनंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी दोषीवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

बांगलादेशमध्ये हिंदूवर हल्ले; पंतप्रधानांचे कारवाईचे आदेश, ४५० जण अटकेत
पीरगंज पोलीस ठाणे प्रभारी सुरेशचंद्र यांनी सांगितले की, आरोपी मामुन याने हिंसाचाराच्या रात्री पेट्रोल टाकून आग लावली होती. नवखालीमध्ये हिंदू समुदायाविरोधात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या एका नेत्यासह ११ जणांना अटक केली. हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी शैकत मंडलसह ६८३ जणांना अटक केली आहे.

मुख्य आरोपीची कबुली

हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शैकत मंडल याने रविवारी मॅजिस्ट्रेटसमोर गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे वृत्त आहे. त्याच्याच फेसबुक पोस्टमुळे १७ ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा दरम्यान पीरगंज उपजिल्ह्याच्या रंगपूरमध्ये हिंसाचार झाला होता. मंडलचा सहकारी रबीउल इस्लाम (वय ३६) मौलवी आहे. त्याच्याविरोधात आग लावणे, लुट करणे आदी आरोप आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: