केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे भूमिपूजन

केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे भूमिपूजन
पंढरपूर /नागेश आदापूरे, दि.२५ ऑक्टोबर - देशभरातून पंढरपूर येथे लाखो वारकरी पायी येत असतात. या येणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे भूमिपूजन येत्या शनिवार ३० आँक्टोंबर रोजी विविध महाराज मंडळी यांच्या हस्ते केले जाणार असून या कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे uddhav thakare,उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर विश्रामगृह येथे  पत्रकार परिषदेमध्ये दिली .  

    यावेळी पत्रकार परिषदेस भाजपा सोलापूर  जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ,मंगळवेढा बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे ,भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे ,पंढरपूरचे नगरसेवक विक्रम शिरसट,प्रा.सुभाष मस्के, सुनील भोसले आदी उपस्थित होते .

आषाढी वारीसाठी आळंदी देहूमधून लाखो भाविक पंढरपूर येथे चालत येत असतात . हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रध्देचा विषय आहे .लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात तो रस्ता भव्य व सुंदर असावा,भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये या हेतूने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारी करण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचे भूमिपूजन करण्यात आले नव्हते .

 सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी नितिन गडकरी यांची कराड येथे भेट घेवून सदर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्याचे निमंत्रण दिले.त्यानुसार शनिवार ३० रोजी सकाळी अकरा वाजता रेल्वे मैदानावर सदर कार्यक्रम पार पडणार आहे.हा रस्ता वारकर्यांसाठी करण्यात आला असल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज दिंडीमधील प्रमुख महाराज मंडळी यांच्या हस्ते नारळ वाढवला जाणार असल्याचे परिचारक यांनी सांगितले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजीत पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालखी मार्गावरील गावाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार ,आमदार यांचीही उपस्थित राहणार आहे . 

  सदर रस्त्याच्या सुशोभिकरणाबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या वेबसाईटवर सूचना कराव्यात असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे .

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी ६ हजार ६९३ कोटी तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी ३ हजार ७९८ कोटी असा जवळपास दहा हजार कोटी रूपयांचा निधी या दोन्ही रस्त्यां साठी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून मंजूर करण्यात आला आहे यापैकी पालखी मार्गाचे काम सुरू झाले असून वाखरी ते मोहोळ ९९ टक्के , वाखरी ते खुडूस ९६ टक्के खुडूस ते धर्मपुरी ९६ टक्के , धर्मपुरी ते लोणंद १८ टक्के , लोणंद ते जेजुरी ६८ टक्के तर जेजुरी ते हडपसर ५१ टक्के जमीन अधिग्रहण करण्याचे काम झाले आहे. तुकोबाराय मार्गाचे देखील जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. या दोन्ही मार्गावर पालखी तळ असून सदर तळ राज्य सरकारच्या ताब्यात असल्याने त्यांनी ते विकसीत करावे अशी अपेक्षा आहे असे आ प्रशांत परिचारक यांनी सांगितले .

भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनीही या कार्यक्रमाबाबत माहिती दिली.कोरोना पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून हा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे असे ही ते म्हणाले. 

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: