वानखेडे प्रकरण: मुख्यमंत्री ठाकरे लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र; मलिक यांची माहिती


हायलाइट्स:

  • वानखेडे प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी घेतली मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट.
  • मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आश्वासन- नवाब मलिक.
  • या प्रकरणी मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहेत- नवाब मलिक.

मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर (Drugs Party) एनसीबीने (NCB) छापेमारे केल्यानंतर अमली पदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राज्याचे अलंपसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सतत आरोप करत आहेत. तसेच या प्रकरणात पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walde Patil) यांची भेट घेऊन चर्चा केली. आता या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. (cm thackeray to write letter to pm modi on wankhede case says nawab malik)

क्लिक करा आणि वाचा- ‘त्या’ बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश; पडक्या घरामागे दबा धरून बसला होता

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर मलिक यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्याला दिल्याचे मलिक म्हणाले. या प्रकरणी कारवाई होणार असून ही कारवाई व्यक्ती विरुद्ध नसून घटनेवर आधारित असेल आणि या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल असे मलिक म्हणाले. यावरून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा- अशी अडकली गुजरातची ‘हेल्मेट गँग’ अहमदनगर पोलिसांच्या जाळ्यात

परभणी नांदेड जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना या प्रकरणाशी संबंधित काही घडामोडी झाल्या. यादरम्यान एका पंचाने सर्व प्रकार समोर आणलेले आहेत. यानंतर मी जे आरोप करत होतो त्यात भर घालणाऱ्याच या गोष्टी होत्या हे स्पष्ट झाले आहे. आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी आपण केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मला कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- काल दिलासा, आज चिंता! राज्यात करोनाचे आज हजारावर नवे रुग्ण, मृत्यूसंख्येतही वाढSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: