इंधन निर्मिती प्रकल्प देणार शेतक-यांना उभारी – डॉ.खपाले

इंधन निर्मिती प्रकल्प देणार शेतक-यांना उभारी – डॉ.खपाले Farmers will be given fuel generation projects – Dr.Khapale
 पंढरपूर ,प्रतिनिधी- एमसीएलच्या माध्यमातून उभारण्यात येणारा गवतापासून जैविक इंधन व सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प पंढरपूर तालुक्यातील शेतक-यांना उभारी देण्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार असून यामुळे रोजगार निर्मिती तर होईलच परंतु शेतक-यांचे जीवनमान उंचविण्या साठीही मदत होणार असल्याचे प्रतिपादन डॉ. हनुमंत खपाले यांनी केले.

    पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एमसीएल कंपनी अंतर्गत नंदादीप बायोफ्युएल्स प्रा.लि.या प्रकल्पाचे भुमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी डॉ. हनुमंत खपाले बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी ग्रामद्योजक दिग्वीजय बाजारे, रहीम पटवेगीरी, महादेव गायकवाड, नानासाहेब देवकर, विष्णु व्यवहारे, निखील शिंदे, तात्यासाहेब गायकवाड, कंपनी प्रतिनिधी किशोर सोनवले आदी उपस्थित होते.

 पुढे बोलताना,डॉ.खपाले यांनी सांगितले की, कंपनीचे संस्थापक भिमराव कोंडुभैरे व मार्गदर्शक नानासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेल्या या प्रकल्पामध्ये सुपर नेपीयर या गवताच्या विकसीत वाणापासुन इंधन व सेंद्रीय खत निर्मिती करण्यात येणार आहे.त्याचे बियाणे कंपनी पुरविणार आहे. हे उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांना फारसे कष्ट व खते लागत नाहीत. हे गवत कंपनी शेतक-यांकडुन विकत घेणार असून त्यापासुन इंधन निर्मिती करणार आहे. यामुळे शेतक-यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून त्यांचे अर्थिक जीवनमान उंचविणार आहे.

 या कार्यक्रमप्रसंगी दिग्वीजय बाजारे, कंपनी प्रतिनिधी किशोर सोनवले यांनी या प्रकल्पाबाबत माहिती देवून शेतक-यांना सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी शपथ वाचन करून वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: