pegasus snooping row : पेगासस हेरगिरी प्रकरणी केंद्राला झटका; सुप्रीम कोर्टाने नेमली चौकशी समिती, कोण आहेत समितीत?
आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. त्याचा उपयोग जनहितासाठी व्हायला हवा. वृत्तपत्र स्वातंत्र्य हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. तंत्रज्ञानासह त्याचा गंभीरपणे गैरवापर केला जाऊ शकतो. आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. आम्ही सरकारला उत्तर देण्याची पुरेशी संधी दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेमुळे ते उत्तर देऊ शकत नाही, असे सरकारने म्हटले आहे. तुम्ही जे सांगू शकता, तेवढे सांगा, असे आम्ही सरकारला म्हटले. पण सरकारने उत्तर दिले नाही. यामुळे सुप्रीम कोर्ट फक्त मूक गिळून बसून शकत नाही, असं भारताचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं.
केंद्राने कोणतेही विशेष खंडन केले नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याची याचिका प्रथमदर्शनी स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. एक तज्ञ समिती नियुक्त करतोय. ही समिती सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली काम करेल. तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आर. व्ही. रवींद्रन करणार आहेत. इतर सदस्य आलोक जोशी आणि संदीप ओबेरॉय असतील, असं सुप्रीम कोर्टाने सांगितले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काय म्हणाली काँग्रेस?
आम्ही सरकारला उत्तर देण्याची भरपूर संधी दिली. राष्ट्रीय सुरक्षेमुळे उत्तर देऊ शकत नाही, असे सरकारने म्हटले आहे. पण भाजप सरकारला काहीतरी लपवायचे होते, हे आता स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या या समितीच्या चौकशीनंतर देशाला न्याय मिळेल, अशी आशा आहे, असं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अभय दुबे म्हणाले.
VIDEO: भाजप मंत्र्यांनं पंतप्रधान मोदींना दिली ‘परमात्म्या’ची उपमा!
समितीच्या तांत्रिक सदस्यांची माहिती
१. डॉ. नवीनकुमार चौधरी (डीन, राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान समिती, गांधीनगर)
२. डॉ. प्रभाकरन (प्राध्यापक, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग, अमृता विश्व विद्यापीठम, केरळ)
३. डॉ. अश्विन अनिल गुमास्ते (असोसिएट प्रोफेसर, IIT मुंबई)
Chattisgarh: सरकारी कार्यालयात घुसून आमदाराची गुंडागर्दी, कर्मचाऱ्याचा डोळा फोडला