आत्मविश्वास जिद्द या जोरावर माणूस कशावरही मात करू शकतो – प्रा.दुपडे

आत्मविश्वास जिद्द या जोरावर माणूस कशावरही मात करू शकतो – प्रा.दुपडे Man can overcome anything on the strength of self-confidence – Prof. Dupade
जनकल्याण कोवीड सेंटरमध्ये व्याख्यान कार्यक्रम
  पंढरपुर,(प्रतिनिधी) दि.१४- जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असले पाहिजे आत्मविश्वास जिद्द या जोरावर माणूस कशावरही मात करू शकतो.कोरोना आजार हा किरकोळ आहे मनातून भीती काढा,मला काहीच होणार नाही असा विचार करा तुम्ही निम्मे नक्की बरे होणार,असे जनकल्याण पेड कोवीड सेंटरमधील रुग्णांकरिता व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी व्याख्याते प्राध्यापक दुपडे बोलत होते. 

सोलापूर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे उपचाराअभावी रुग्णांची होणारी धावपळ लक्षात घेऊन युवा गर्जनाचे संस्थापक समाधान काळे यांनी कोवीड रुग्णाकरीता 100 बेडचे जनकल्याण पेड कोवीड केअर सेंटर सुरु केले असून समाजा तील गरजू रुग्णांना अल्पदरात सुविधा तसेच मनोरंजन कार्यक्रम व्याख्यान कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत मोलाचे कार्य करीत असल्याचे प्राध्यापक दुपडे सर यांनी सांगितले.

  नागरिकांनी नियमित मास्क सोशल डिस्टन्सचे पालन केले तर आपण कोरोनावर नक्की मात करू. कोणताही आजार असला तरी अंगावर न काढता तात्काळ तपासणी करून त्यावर उपचार करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे डॉ.शिनगारे यांनी सांगितले. 

     यावेळी प्राध्यापक दुपडे सरांचा सत्कार जनकल्याण हॉस्पिटलचे डॉ सुधीर शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी समाधान काळे डॉ अनिल काळे,डॉ प्रकाश जडल, डॉ श्रेया जाधव,डॉ ऐश्वर्या देठे तसेच नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: