टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचा फॉर्म्युला सापडला; या संघांना होतोय फायदा


दुबई: युएईमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धा सुरुवातीच्या टप्प्यात आहे. सेमीफायनलचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी एक खास ट्रेंड समोर येत आहे. यावरून वर्ल्डकप कोणत्या दिशेने पुढे जात आहे आणि त्याचा कोणाला फायदा होतोय ये लक्षात येईल. सुपर १२ फेरीत आतापर्यंत झालेल्या ७ लढतीपैकी ६ लढतीत प्रथम फिल्डिंग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. फक्त एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवता आलाय. ही लढत अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड सारख्या कमकूवत टीममध्ये झाली होती.

वाचा- फिक्सरला सिक्सर… बॉल आउट ऑफ द पार्क; हरभजन सिंगने पाकिस्तानला धडा शिकवला

धीम्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी अवघड

वर्ल्डकपमधील मॅच मग अबुधाबी, शारजाह मध्ये असो की दुबईमध्ये जो संघ प्रथम फलंदाजी करून मोठे लक्ष्य सेट करतो त्यांना विजय मिळवण्यात अडचणी येत आहेत. ग्रुप फेरीतील ७ सामन्यात फक्त दोन वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी १७० पेक्षा जास्त धावा केल्या.

वाचा- IND vs NZ: पाकिस्तानच्या विजायनंतर कसा असेल भारताचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग

युएईमध्ये ऑक्टोबरच्या अखेर रात्री दव मोठ्या प्रमाणात पडते. यामुळे गोलंदाजांना चेंडूवर ग्रिप बनवण्यात अडचणी येतात आणि फलंदाजाला सोप पडते. दवामुळे बॅटिंग करणाऱ्या संघाला फायदा होतो. दवाचा परिणाम कमी व्हावा यासाठी केमिकलचा वापर केला जात आहे. पण त्याचा उपयोग होताना दिसत नाही.

वाचा- क्रिकेटच्या १५ खेळाडूंनी तालिबानला धडा शिकवला; अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे धाडसी कृत्य

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रात देखील प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा झालेला दिसतो. ३१ पैकी २१ सामन्यात त्यांनीच विजय मिळवला ज्यांनी प्रथम फिल्डिंग केली. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत विजय साकारला होता.

भारत आणि विराट यांना हवी….

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा टॉस जिंकण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने टॉस गमावला. भारताची दुसरी लढत ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध आहे. भारतीय चाहत्यांची इच्छा हीच असेल की विराटने टॉस जिंकावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: