क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक; बीट्सझचा क्रिप्टो एक्सचेंज सुरु, वाॅलेटवर मिळणार विमा संरक्षण


हायलाइट्स:

  • क्रिप्टो एक्सचेंज बिट्झ नुकताच सुरु करण्यात आला.
  • बीट्सझने फायरब्लॉक्स सोबत भागीदारी केली आहे.
  • ते वापरकर्त्यांना सर्व प्रकारच्या वाॅलेटवर विमा प्रदान करेल.

हैदराबाद : भारतात बनविलेल्या क्रिप्टो एक्सचेंज बिट्झ नुकताच सुरु करण्यात आला. बीट्सझने डिजिटल अॅसेट मॅनेजमेंटमध्ये नेतृत्व असलेल्या, फायरब्लॉक्स सोबत भागीदारी केली आहे. ते वापरकर्त्यांना सर्व प्रकारच्या वाॅलेटवर विमा प्रदान करेल. यासोबतच व्यासपीठावर ३० दशलक्ष व्यवहारांना अनुमती देणारे बीट्सझ हे सर्वाधिक वेगवान एक्सचेंज बनेल, असा दावा कंपनीने केला आहे.

सणासुदीत महागाई ‘रंग’ दाखवणार; या कंपन्यांनी दिले दरवाढ संकेत, होणार असा परिणाम
या नवीन क्रिप्टो एक्सचेंज व्यासपीठाच्या प्रक्षेपणाबद्दल आनंद समायोजित करताना बीट्सझचे संस्थापक नवीन कुमार म्हणाले, “क्रिप्टो चलनांची वाढ होत आहे, आणि आम्ही याबाबतीत सकारात्मक आहोत की ते बाजाराचे नेतृत्व करेल. डिजिटल चलनाविषयी जागरूकतेचा अभाव आहे, आणि ही समस्या या व्यासपीठाच्या मदतीने सोडवली जाऊ शकते. हे व्यासपीठ जे सर्व खात्यांसाठी विमा पुरविते, सुरू करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात आले आहेत. बाजारातील अन्य व्यासपीठाच्या तुलनेत बीट्सझ हे एकमेव व्यासपीठ आहे जे प्रत्येक वापरकर्त्याचे वॅलेट सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करते. या व्यासपीठाला बग्ज नाहीत आणि ते मनी लाँडरिंगच्या विरोधात समर्थन देते. यावेळी अभिनेत्री निधी अगरवाल अन्य मान्यवर व्यक्तींसह सहभागी झाल्या.

घर खरेदीची सुवर्णसंधी; ‘या’ सरकारी बँंकेने गृहकर्ज केले स्वस्त, या दराने मिळेल कर्ज
नवीन पुढे म्हणाले, की हे पाहणे खरोखर रोमांचक आहे की अनेक युवा तरुण आणि क्रिप्टो उत्साही बिट्झ मध्ये इतकी रुची दाखवीत आहेत. सध्या या व्यासपीठावर १ दशलक्षहून अधिक व्यापार प्रमाण आहे, त्यात पाच हून अधिक एक्सचेंजेस सूचीबद्ध आहेत आणि दोन हजारांहून अधिक किरकोळ गुंतवणूकदार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

पैसे कमविण्याची संधी; आठवडाभरात दोन आयपीओ खुले होणार, कोणते ते जाणून घ्या
बीट्सझ, त्यांच्या एक्सचेंजच्या अनोख्या संकल्पनेमुळे आणि व्यापाराच्या उच्च अपेक्षेमुळे, अगदी नोंदणीच्या दिवसापासून अन्य क्रिप्टो व्यावसायिकांकडून भरपूर कुजबुज आकर्षित करीत आहे. संपूर्ण क्रिप्टो उद्योग प्रथमच साक्षीदार होत असलेल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे बीट्सझ क्रिप्टो गुंतवणूकदारांसाठी सतत आकर्षणाचे केंद्र देखील बनून रहात आहे. बीट्सझ एक असे व्यासपीठ सादर करीत आहे, जे जलद व्यवहार, वॅलेटवरील विमा, अत्यंत सुलभ यूआय, २४*७ बहुभाषिक थेट गप्पा (लाईव्ह चॅट), ग्राहक समर्थन आणि एआय प्रस्ताव प्रदान करते.

पॉलिसी बझारचा आयपीओ ; १ नोव्हेंबरला खुला होणार इश्यू, जाणून घ्या अधिक माहिती
निधी अगरवाल म्हणाल्या, मी स्वतः एक व्यवसाय विद्यार्थी असल्याने, क्रिप्टो चलनांमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे मला पूर्णपणे समजतात. बीट्सझ, एक व्यासपीठ म्हणून १०० टक्के विमा प्रदान करण्याच्या संकल्पनेमुळे वापरकर्त्यांसाठी वेगळे आहे. मला आज कळले की स्त्रिया स्वतंत्र असून देखील, ३३ टक्के महिला या नेहमीच गुंतवणूकीचे निर्णय घेतांना त्यांच्या कुटुंबातील पुरुषांना सामील करतात. मी पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही त्यांनी पुढे येऊन क्रिप्टो चलनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करू इच्छिते असे त्यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: