पंचानी राज्यात समांतर राज्य घटना चालवू नये – ना.डॉ.नीलम गोऱ्हे

पंचानी राज्यात समांतर राज्य घटना चालवू नये – ना.डॉ.नीलम गोऱ्हे Parallel state events should not be run in Panchani state – Dr.Neelam Gorhe

राज्यातील ज्या विविध जातीमधील जातपंचायती आहेत त्यातील पंचानी राज्यात समांतर राज्य घटना किंवा भारतीय संहिता कायद्यात हस्तक्षेप करू नये… ना.डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे/मुंबई दि.१४ : अकोला येथील जातपंचायती मधील पंचांनी एक पीडित महिलेला घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याबद्दल थुंकी चाटण्याची शिक्षा दिली होती. दि.०९ एप्रिल २०२१ रोजी घटना घडून देखील गुन्हा दाखल झाला नव्हता. परंतु याबद्दल विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सूचना केल्यानंतर जळगाव, चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे झिरो अंतर्गत गुन्हा दाखल करून तो अकोला पोलीस यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

   यासंदर्भात ना.डॉ.गोऱ्हे यांनी आज अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्याशी संपर्क करून काही सूचना केल्या यात 

◆ या गुन्ह्याच्या खोलात जाण्याबरोबरच ज्या लोकांनी गुन्हा करण्यासाठी मदत केली तसेच प्रवृत्त केले त्यांच्यावरही योग्य ती कारवाई आणि जरूर पडेल तिथे प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या महिलेला न्याय मिळेल.
◆ तात्काळ चार्जशीट दाखल करावे.
◆ अकोला जिल्ह्यात ज्या कोणत्या जातीमध्ये जे जातपंचायतीचे सदस्य आहेत त्यांना आवाहन करण्यात यावे की, कायदेविषयक घटनेत त्यांना कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा अधिकर नाही.या पंचांनी मनमानी करून समांतर राज्य घटना चालवू नये.

या मुद्यांवर ना.डॉ.गोऱ्हे यांना पोलीस अधीक्षक अकोला यांनी त्वरित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: