पाकिस्तानच्याच खेळाडूने वकार युनिसचे दात घशात घातले, म्हणाला हिंदू असल्याचा अभिमान आहे…


T20 World Cup 2021 : दुबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनिसने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर हिंदूंना दुखावणारे वक्तव्य केले होते. पण आता पाकिस्तानच्याच माजी खेळाडूने वकारचे दात घशात घातले आहेत.

वकार युनूस एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, ‘सामन्यादरम्यान रिझवानने मैदानात उभे राहून नमाज अदा केली. तेव्हा आसपास हिंदू खेळाडू होते. ते माझ्यासाठी खूप खास होते.’ वकार यांच्या या वक्तव्यानंतर चोहोबाजूंनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरवात झाली. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही वकार युनूस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून वकार यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, असे आवाहनही केले. त्यानंतर वकार यांनी माफीही मागितली, पण एकीकडे हा प्रकार सुरू असतानाच पाकिस्तानी हिंदू क्रिकेटर दानिश कनेरियानेही वकारला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

दानिश कनेरियाने व्यक्त केली नाराजी
टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानने भारतावर विजय मिळवल्यानंतर खेळाचे मूल्यांकन करताना वकार युनूस हे भलतीकडेच भरकटत गेले. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज दानिश कनेरियाही वकार यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. कू या सोशल मीडियावर पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये दानिश म्हणाला की, वकार युनूस यांनी पाकिस्तानमधील एका चॅनेलवर हिंदूंबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. किती भेदभाव केला जातो, हे यावरून दिसून येतो. खेळात धर्म आणू नका.’

भयंकर! हर्षा भोगलेंचं ट्विट व्हायरल
हर्षा भोगले यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करत वकार युनूस यांच्या वक्तव्याला खेळाच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे. हर्षा भोगले यांनी ट्विट केले की, “रिझवानला हिंदूंसमोर नमाज अदा करताना पाहणे, खूप खास होते, हे वकार युनूससारख्या दर्जेदार खेळाडूने सांगणे ही मी ऐकलेली सर्वात निराशाजनक गोष्ट आहे. आपल्यापैकी बरेचजण अशा गोष्टींना दडपून खेळ आणखी वर नेण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत या सर्व गोष्टी ऐकणे भयंकर आहे.”

हा माझा हेतू नव्हता
बराच गोंधळ झाल्यानंतर अखेर वकारने ट्विट करत माफीनामा प्रसिद्ध केला, मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत. त्यावेळच्या वातावरणात मी असे काही बोललो ज्यावर माझादेखील विश्वास नाही आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. याबद्दल मी माफी मागतो. माझा तसा हेतू नव्हता. मी एक चूक केली. खेळ जात, धर्म इत्यादींचा विचार न करता लोकांना एकत्र आणतो.”Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: