फरार किरण गोसावी अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; अटकेची कारवाई होणार?
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत किरण गोसावीनं तो लखनऊमध्ये असल्याचं म्हटलं होतं. तसंच, मी लखनऊ पोलिसांनी शरण जाण्यासही तयार असल्याचं तो बोलला होता. मात्र, लखनऊ पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी किरण गोसावीला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊला रवाना झालं होता. त्यानंतर आज त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी आज किरण गोसावीला ताब्यात घेतलं आहे. तसंच, आजच त्याला कोर्टात हजर करणार असल्याची माहिती आहे. तसंच, पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनकडून त्याच्या अटकेची कारवाई होऊ शकते, अशी शक्यता आहे.
दरम्यान, प्रभाकर साईल हा खोटं बोलत असून त्याचे सीडीआर अहवाल तपासावे, अशी माझी विनंती आहे. माझे, प्रभाकर साईल व त्याच्या भावाचे सीडीआर व चॅट तपासावे सगळं सत्य समोर येईल, असं किरण गोसावी यांनं म्हटलं होतं. तसंच, महाराष्ट्रातील एक मंत्री किंवा विरोधी पक्षातील एखाद्या तरी नेत्यांनं माझ्या बाजूने उभे राहाले. त्यांनी मुंबई पोलिसांना सीडीआर व चॅट तपासण्याची विनंती करावी. एकदा का अहवाल समोर आला की सगळं सत्य समोर येईल, असा दावा किरण गोसावीनं केला आहे.