कोरोना रुग्णसेवा व मदत कार्यासाठी शिवसेनेची समिती स्थापन

कोरोना रुग्णसेवा व मदत कार्यासाठी शिवसेनेची समिती स्थापन,आ.तानाजी सावंत यांच्या आदेशानुसार अमंलबजावणी Establishment of Shiv Sena Committee for Corona Hospital Service and Relief Work
 पंढरपूर, १५/०५/२०२१- शिवसेनेचे उपनेते सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आ.डॉ.तानाजी सावंत यांनी पंढरपुर विभागातील पंढरपूर, सांगोला,माळशिरस,माढा,करमाळा तालुक्यातील उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पंढरपूर येथे बैठक घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या भागातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना आ.तानाजी सावंत यांनी केली होती.  

आज सदर समितीची घोषणा करण्यात आली असून या समितीमध्ये साईनाथ अभंगराव अध्यक्ष ,धनंजय डिकोळे उपाध्यक्ष,संभाजीराजे शिंदे सचिव,महावीर देशमुख कार्याध्यक्ष ,सूर्यकांत घाडगे समन्वयक तर सदस्य म्हणून दत्ता पवार, सुधीर अभंगराव,भरत आवताडे,सचिन बागल, मधुकर देशमुख, नामदेव वाघमारे,सुधाकर लावंड, आशाताई टोणपे,गणेश इंगळे यांचा समावेश आहे.

  पंढरपुर उपविभागाअंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार्‍या अडचणी,ऑक्सिजन, रेमिडिसीवीरचा पुरवठा,बेडची उपलब्धता,महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारख्या योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी साहाय्य करणे,शासनाच्या नियमानुसार कोरोना रुग्णावर उपचाराचे दहा दिवसाचे बिल जास्तीत जास्त 57 हजार रुपये आकारण्यात येते का याची पाहणी करणे,कोरोना बाधितांना आवश्यक असलेले औषधे रास्त दरात उपलब्ध करुन देणे,हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नावाचा फलक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावणे, शासनाने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून जाहीर केलेले अन्नधान्य वाटप सुरळीतपणे होते की नाही याची दक्षता घेणे,राज्य सरकारने जाहीर केलेले 1500 रुपयांचे अर्थसहाय पात्र रिक्षा चालक व बांधकाम कामगार यांना मिळाले पाहिजे यासाठी पाठपुरावा करणे तसेच वेळोवेळी नागिरकांकडून प्राप्त होणार्‍या तक्ररींंचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करणे आदी जबाबदारी या समितीच्या माध्यमातून पार पाडल्या जाणार असल्याची माहिती शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी दिली आहे.

   तरी बिलाबाबत, इंजेक्शन्स उपलब्धतासाठी, रेशनकार्डवरील धान्य वाटप किंवा कोणी कोणत्याही प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करत असल्याचे निदर्शनास आले तर तातडीने आम्हाला संपर्क साधावा म्हणजे त्याची शहानिशा करून कारवाई करण्यात येईल असे या समितीचे अध्यक्ष साईनाथ अभंगराव यांनी सांगितले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: