Mumbai Drug Case: ‘किरण गोसावी कात्रजमधील एका लॉजमध्ये होता, ‘या’ नावानं राहत होता’


हायलाइट्स:

  • किरण गोसावी वेगवेगळ्या शहरांत फिरत होता
  • सचिन पाटील नावानं हॉटेल बुक करायचा
  • कात्रज परिसरातील लॉजमधून पोलिसांनी केली अटक

पुणे: पुण्यातील फसवणुकीच्या प्रकरणात फरार असलेला आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे समाज माध्यमांसमोर आलेला किरण गोसावी (Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी (Pune Police) गुरुवारी सकाळी अटक केली. गोसावी याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या दोन टीम त्याच्या मागावर उत्तर प्रदेश, लखनौ या ठिकाणी गेल्या होत्या. मात्र, त्याला पुण्यातील कात्रज परिसरातील एका लॉजमधून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

गोसावी याच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात २०१८ साली एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. नोकरीच्या आमिषाने त्याने एका तरुणाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच, अन्य काही तरुणांना देखील त्याने फसवले होते. त्याच्या विरोधात २०१९ रोजी त्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्याला फरार घोषित करण्यात आले होते. मात्र, मुंबईच्या समुद्रात क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीत आर्यन खानला घेऊन जाताना गोसावी सर्वप्रथम दिसून आला होता. तो या प्रकरणात नार्कोटिक्स क्राइम ब्युरोचा पंच होता. यानंतर पुणे पोलिस गोसावीच्या शोधात होते. दरम्यान, पोलिसांनी गोसावीविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती. तसेच, त्याच्या एका मॅनेजरला अटक देखील केली होती.

वाचा: क्रांती रेडकर हिचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाली, आज बाळासाहेब असते तर…

त्यानंतर गोसावी लखनौ, उत्तरप्रदेशात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या दोन टीम त्याच्या मागावर होत्या. त्याने दोन वेळा पुणे पोलिसांना गुंगारा दिला होता. हैदराबाद, लखनऊ, फतेपूर सिक्री, जळगाव, लोणावळा अशा वेगवेगळ्या शहरांत तो फिरत होता. ‘सचिन पाटील’ या नावानं हॉटेल बुक करायचा. तो पुण्यात स्वत: हजर होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे बुधवारी दिवसभर शिवाजीनगर कोर्ट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला रात्री पकडले आहे. त्याला कात्रज भागातून पकडण्यात आले आहे.

वाचा: अटकेआधी किरण गोसावी बोलला! म्हणाला, ‘मी मराठी माणूस; कोणीतरी माझ्या…’

”पुणे पोलिस किरण गोसावीच्या मागावर होते. त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कात्रज परिसरातील एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला कोर्टात हजर केले जाईल.” अमिताभ गुप्ता (पोलीस आयुक्त, पुणे)Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: