पंढरपूर एसटी आगारामध्ये प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आणि प्रवाशांचे हाल सुरू
पंढरपूर एसटी आगारामध्ये प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आणि प्रवाशांचे हाल सुरू

पंढरपूर /नागेश आदापुरे – पंढरपूर येथील राज्य परिवहन महामंडळांच्या चालक वाहक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज गुरुवार 28 /10/ 2021 पासून आगारातील बस बंद करून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील सर्व संघटनेच्या कृती समितीने उपोषण करण्याची घोषणा केली.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झाले पाहिजे, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता चालक वाहक यांना मिळाला पाहिजे, घर भाडे मिळाले पाहिजे, दीपावली सणासाठी बोनस मिळाला पाहिजे या मागण्यां साठी पंढरपूर आगारातील बेमुदत उपोषण सुरू केले असून लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद करून बस स्थानकावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सणासुदीच्या काळात बससेवा अचानक बंद झाल्यामुळे प्रवासी नागरिक महिला,शालेय आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी यांचे मोठी गैरसोय झाली आहे.
आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत उपोषण चालू राहील अशी माहिती एसटीतील कर्मचारीवर्गाने दिली. यावेळी तानाजी खरात, सचिन वाघ, योगेश पवार,सोमनाथ अष्टेकर, गणेश पवार,संजय गंगणे,शशी ताठे, संजू ताठे,सौ माळी, सौ बोंदर,सौ पाटील,सौ बोबडे,सौ देशमुख,सौ जे एम माने,सौ मगरूमखाणे,सौ सुवर्णकार ,सौ आतार आदी एसटी महामंडळाचे कर्मचारी या बेमुदत उपोषणात सहभागी झाले आहेत .