लग्नाच्या वाढदिवसाला कुर्डुवाडीत पत्नीबरोबर पुन्हा दुसरे वेळी बोहल्यावर
लग्नाच्या वाढदिवसाला कुर्डुवाडीत पत्नीबरोबर पुन्हा दुसरे वेळी बोहल्यावर On his wedding anniversary, he met his wife in Kurduwadi for the second time
कुर्डुवाडी – कुर्डूवाडी शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि अध्यक्ष म्हणून परिचित असलेले राहुल धोका हे लग्नाच्या विसाव्या वाढदिवसा दिवशी पुन्हा दुसरे वेळी बोहल्यावर चढले.

यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. बहारो फुल बरसाओ या गाण्यावर वायफायवर संगीत वाजवत स्वतःच शेतात सजावट करून पुन्हा एकदा पत्नीशी दुसऱ्यांदा मंगल आष्टकांसह लग्न केले. सदर पोस्ट सोशल मीडियामध्ये फिरत होती.वर्हाडी मंडळी म्हणून त्यांची दोन मुले सम्यक व देव आणि आई,वडील,भाऊ,भावजई उपस्थित होते. लग्न मंडपामध्ये स्कुटीवर नवरी मुलगी सौ.सरला ही स्वतःच पती राहुलला घेवून आली होती.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोरोना काळात ही जगण्याची आशेचा किरण देणारा हा लग्नाचा वाढदिवस पुन्हा लग्न करून आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला . त्यानंतर नारळाचे झाड आठवण म्हणून त्यांनी लावले.
यावेळी बोलताना धोका म्हणाले वीस वर्षानंतर मी पुन्हा लग्न करत आहे आणि चारीत्र्य हाच धर्म आहे.प्रत्येक जन्मी हिच माझी जोडीदार राहील आणि हिलाच माळ घालणार असा माझा विश्वास आहे.