प्रशांत किशोर यांचे काँग्रेसबाबत मोठे वक्तव्य, भाजपने दिली प्रतिक्रिया
प्रशांत किशोर यांनी काही नवीन सांगितलेलं नाही. ही बाब देशाला माहिती आह, असं भाजपचे प्रवक्ते राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले. यासोबतच त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. याविषयी राहुल गांधींचे नक्कीच वेगळे मत असेल. राहुल गांधींनी देशाचा आवाज कधी ऐकला नाही आणि भविष्यातही ऐकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
प्रशांत किशोर काय म्हणाले?
भाजप विजयी झाला काय किंवा पराभव झाला काय याने काही फरक पडणार नाही. कारण पुढील अनेक वर्षे भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील, जसं स्वातंत्र्यानंतर काँग्रेस ४० वर्षे सत्तेत होती. यामुळे भाजप हटणार नाही. पण भाजप आणि मोदी हे आता काही काळापुरताच सत्तेत आहे, आणि ते जातील, या भ्रमात राहुल गांधी आणि काँग्रेस आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले. पण जनतेच्या सूचनांवर आधारित केंद्रातील मोदी सरकार धोरणं बनवते. हे सरकारचे वैशिष्ट्य आहे. राजकारणाबाबत तरुणांची सकारात्मक मते आहेत, असं राठोड म्हणाले.
prashant kishor : पुढील अनेक दशकं भाजपच सत्तेत राहणार! प्रशांत किशोर यांच्या दाव्यात किती दम? वाचा…
पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या तयारीवरही राठोड बोलले. राज्यात काँग्रेस कमकुवत झाली आहे. या फायदा घेण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष करत आहे, असं राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सांगितलं.